Organ Transplant
Organ TransplantSaam Tv

Organ Transplant : मुंबईत २४ तासांत ६ अवयव प्रत्यारोपण; सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा नवा विक्रम !

Health Tips : एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होणारे अवयवांचे प्रत्यारोपण आज जगभरात काही विशिष्ट ठिकाणी केले जातात

H.N. Reliance Foundation Hospital : आपल्याकडे दान खूप् महत्त्वाचं मानलं जातं. अन्नदान, जलदान, धनदान, विद्यादान, रक्तदान ही सगळीच दाने श्रेष्ठ मानली गेली आहेत. याच यादीत अजून एक नाव जोडणे गरजेचे आहे, ते म्हणजे अवयवदान.

परंतु, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होणारे अवयवांचे प्रत्यारोपण आज जगभरात काही विशिष्ट ठिकाणी केले जातात. गंभीर स्वरूपाचा हृदयविकार (Heart Attack) किंवा शेवटच्या स्टेजचा किडनीचा (Kidney) आजार (Disease) यासारख्या गंभीर रोगांसाठी ऑर्गन डोनेशन किंवा संबंधित अवयवाचे प्रत्यारोपण हा खात्रीशीर उपाय ठरतो.

Organ Transplant
Kidney Transplant Health : किडनी ट्रान्सप्लंट केल्यानंतर 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा, तुमची एक चूक पडेल महागात !

११ मार्च २०२३ रोजी फक्त २४ तासांच्या कालावधीत, सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने सहा अवयव प्रत्यारोपण केले (१ हृदय आणि १ दुहेरी फुफ्फुस एकत्रित प्रत्यारोपण, १ दुहेरी फुफ्फुस, २ यकृत आणि १ मूत्रपिंड) एकूण २५ शैल्य चिकित्सक, ३० परिचारिका, १५ सहाय्यक कर्मचारी, ४ प्रत्यारोपण समन्वयक आणि रूग्णालयातील विविध टीम प्रत्यारोपणात सहभागी होते.

३ अवयवदान करणाऱ्या कुटुंबांना आणि त्या ५ कुटुंबांना (Family) देखील सलाम करतो ज्यांनी आयुष्य जगण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली असे सर एच एन रिलायन्स फाउंडेशने सांगितले

Organ Transplant
Kidney Transplant : किडनी ट्रान्सप्लंट म्हणजे काय? याचा योग्य कालावधी कोणता ?

हृदय आणि फुफ्फुसाचे एकत्रित प्रत्यारोपण डॉ. अन्वय मुले, संचालक-प्रगत कार्डियाक सर्जरी आणि हृदय प्रत्यारोपण आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वात केले गेले, दोन यकृत प्रत्यारोपण डॉ. रवी मोहंका, संचालक, यकृत प्रत्यारोपण आणि टीम. फुफ्फुस प्रत्यारोपण डॉ. संदीप अट्टावार संचालक, फुफ्फुस प्रत्यारोपण आणि टीम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे नेतृत्व डॉ. रुषी देशपांडे, संचालक, क्रिटिकल केअर - नेफ्रोलॉजी आणि डॉ. आशिक ए रावल, सल्लागार - रेनल ट्रान्सप्लांट सर्जरी, डॉ हेमंत मेहता, संचालक - ऍनेस्थेसिया आणि टीम, डॉ राहुल पंडित, चेअर, क्रिटिकल केअर आणि टीम या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आले.

या प्रसंगी सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे ग्रुप सीईओ डॉ. तरंग ग्यानचंदानी म्हणाले की, आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्याकडे अशा कठीण शस्त्रक्रियेच्या पायाभूत सुविधा आहे. ज्यामुळे आम्ही हे सर्व २४ तासांच्या आत करू शकलो. मी त्या निःस्वार्थी दानशूर आणि अवयव दात्या कुटुंबांचा अत्यंत आभारी आहे ज्यांनी हा जीवन बदलणारा दिवस शक्य केला. आमच्या वैद्यकीय संघांचा आणि त्यांच्या अद्भुत कौशल्याचा खूप आम्हाला अभिमान आहे. तसेच मी मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी आणि समन्वयासाठी ही त्यांचा आभारी आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com