Kidney Transplant Health : किडनी ट्रान्सप्लंट केल्यानंतर 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा, तुमची एक चूक पडेल महागात !

किडनी प्रत्यारोपणानंतर दाता आणि घेणारा दोघांनीही स्वतःची विशेष काळजी घ्यावी.
Kidney Transplant Health
Kidney Transplant HealthSaam Tv

Kidney Transplant Health : नुकतेच लालू प्रसाद यादव याच्यांवर किडनी प्रत्यारोपणाचे यशस्वीरित्या ऑपरेशन झाले. त्यांची मोठी मुलगी रोहिणी आचार्य यांनी लालू यादव यांना किडनी दान केली. किडनी (Kidney) प्रत्यारोपणानंतर दाता आणि घेणारा दोघांनीही स्वतःची विशेष काळजी घ्यावी. थोडासा निष्काळजीपणा जीव घेऊ शकतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर दात्याने आणि प्राप्तकर्त्याने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगणार आहोत.

फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्राम येथील नेफ्रोलॉजी आणि रेनल ट्रान्सप्लांटचे प्रमुख डॉ. सलील जैन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार सगळ्यात मोठी समस्या बनली आहे ज्यामुळे डायलिसिसची आवश्यकता सगळ्यांना वाटू लागते. अशा रुग्णांसाठी किडनी प्रत्यारोपण हा सर्वोत्तम उपचार असल्याचे त्यांनी सांगितले.

Kidney Transplant Health
Kidney Transplant : किडनी ट्रान्सप्लंट म्हणजे काय? याचा योग्य कालावधी कोणता ?

डायलिसिसच्या तुलनेत किडनी प्रत्यारोपणामुळे रुग्णाला चांगले आणि निरोगी आयुष्य मिळू शकते. जैन म्हणाले की, ज्या रुग्णांना डायलिसिसची गरज आहे किंवा जे डायलिसिसकडे वाटचाल करत आहेत, त्यांनी नेहमी किडनी प्रत्यारोपणासाठी पर्याय शोधला पाहिजे. डॉ.सलील जैन यांनी किडनी प्रत्यारोपणानंतर दात्याने आणि घेणाऱ्याने काय लक्षात ठेवले पाहिजे, याची माहिती दिली.

किडनी ट्रान्सप्लंट केल्यानंतर काय करावे ?

  • मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर, प्राप्तकर्त्याने वेळोवेळी औषधे घेणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध बंद करू नये.

  • किडनी प्रत्यारोपणानंतर तुम्हाला कधीही सर्दी, ताप, सांधेदुखी, पुरळ, उलट्या, मळमळ अशा कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. यामध्ये अजिबात गाफील राहू नका.

  • मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर व्यक्तीने उच्च पातळीची स्वच्छता राखली पाहिजे आणि रस्त्यावरील अन्न (Food) खाणे टाळावे. तुम्ही स्वतःला जितके आरोग्यदायी अन्नपदार्थांचे सेवन कराल तितकेच तुम्ही निरोगी व्हाल.

  • घरामध्ये ब्लड प्रेशर मॉनिटरिंग यंत्र असणे आवश्यक आहे ज्यामुळे तुम्ही वेळोवेळी रक्तदाब तपासू शकता. जर तुम्हाला कळले की रक्तदाब थोडा वर किंवा खाली आहे, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

  • शरीराला नेहमी हायड्रेटेड ठेवा आणि दिवसभर द्रवपदार्थांचे सेवन करा.

  • मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर सुमारे 1 ते 2 महिने जड उचलणे टाळा कारण यामुळे टाके ताणले जाऊ शकतात आणि ते तुटण्याचा धोका असतो.

  • वेदना कमी करणारी औषधे घेणे टाळा. शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. वेदना कमी करणारे अँटिबायोटिक्स मूत्रपिंडाचे नुकसान करतात, जे तुमच्यासाठी चांगले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com