Facebook : ट्विटर पाठोपाठ आता फेसबुकनेही कर्मचा-यांना कपात करण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकने घेतलेला हा निर्णय सर्वांनाच हादरवनारा आहे. फेसबुकने (Facebook) तब्बल ११००० कर्मचा-यांना काढून टाकल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मेटा सर्वेअर मार्क झुकरबर्ग यांनी आज ही माहिती दिली. त्यांनी ही माहिती दिल्यावर सोशल मीडियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. कर्मचारी कपाती मागे खरे कारण काय आहे याचा युजर्स विचार करत आहेत.
या निर्णयामुळे एका झटक्यात एवढ्या कर्मचा-यांना रस्त्यावर आणले अशी प्रतिक्रीया उमटत आहे. मात्र मेटाने यावर म्हटले आहे की, कामावरून काढलेल्या प्रत्येक कर्मचा-याला पुढील १६ आठवड्यांचे निश्चीत वेतन पॅकेज स्वरुपात दिले जाईल. तेसच पुढील ६ महिन्यांसाठी त्यांच्या आरोग्याचा (Health) विमा खर्च देखील देण्यात येणार आहे.
झुकेरबर्ग यांचा मेटाध्ये १३ टक्क्यांचा वाटा आहे. मात्र आता जाहिरातीतून येणारे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे मेटाने यावर असा अंदाज लावला आहे की, साल २०२२ मध्ये जाहिरातींच्या महसुलात १० बिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच ही कपात होत आहे.
तर झुकेरबर्ग यांनी यासाठी स्वत:ला जबाबदार ठरवले आहे. कंपनीच्या विकासासाठी त्यांनी अनेकांना भरती केले. मात्र आता हा निर्णय चुकीचा ठरल्याचे ते म्हणत आहेत. अशातच काढून टाकलेल्या कर्मचा-यांना करिअर सपोर्ट दिला जाईल असे देखील स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.