कम्माल! आता Whatsapp Groupमध्ये 1024 मेंबर्स अ‍ॅड करता येणार; पाहा व्हॉट्सअ‍ॅपचे नवे अपडेट्स

Whatsapp New Features: या वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील ग्रुप सदस्यांची संख्या २५६ सदस्यांवरून ५१२ सदस्य करण्यात आली होती.
Whatsapp New Updates News
Whatsapp New Updates NewsSaam Tv

Whatsapp Group News: जगात सर्वात जास्त वापरले जाणारे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) एक कम्माल अपडेट आलं आहे. या अपडेटनुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप फीचरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरचा अभ्यास करणारी वेबसाइट WABetaInfoनुसार व्हॉट्सअ‍ॅप आता ग्रुपमधील सदस्यांची संख्येची मर्यादा वाढवणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या अपडेटनंतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये १०२४ मेंबर्स अ‍ॅड करता येणार आहे. (Whatsapp New Updates)

Whatsapp New Updates News
Video: विद्यार्थ्यांसाठी कायपण! संपूर्ण शाळाच बनवली ट्रेन; आगळ्या-वेगळ्या शाळेत विद्यार्थी जातात आनंदात

या वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील ग्रुप सदस्यांची संख्या २५६ सदस्यांवरून ५१२ सदस्य करण्यात आली होती. आता व्हॉट्सअॅप हा नंबरही दुप्पट करण्याचा विचार करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने सध्या हे फीचर बीटा टेस्टर्सपुरते मर्यादित केले आहे. लवकरच हे फीचर इतर युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाऊ शकते. असा दावाही केला जात आहे की व्हॉट्सअॅपवर 2GB पर्यंतच्या फाइल्स शेअर करण्यासाठी अपडेट देण्यात येणार आहे. (Tech News In Marathi)

Whatsapp प्रीमियम

दरम्यान व्हॉट्सअॅपने बिझनेस अॅपच्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील सुरू केले आहे. या क्षणी फक्त काही वापरकर्त्यांनाच त्याचे अपडेट मिळत आहे. व्हॉट्सअॅप प्रीमियमचे अपडेट बीटा वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. बीटा वापरकर्ते त्यांच्या अॅपमध्ये प्रीमियम मेनू पाहू शकतात. वापरकर्त्यांना प्रीमियम मेनूमध्ये अनेक अतिरिक्त फीचर्स मिळतील. प्रीमियम सबस्क्रीप्श केवळ व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपसाठी आहे. प्रीमियम सबस्क्रिप्शन अंतर्गत, बिझनेस अॅप वापरकर्त्याला कॉन्टॅक्ट लिंक कस्टमाइझ करण्याचा पर्याय मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com