Diwali Trip Near Pune: दिवाळीच्या सुट्टीत धमाल करायचीये? मग पुण्यातल्या या पिकनिक स्पॉट्सला नक्की भेट द्या

One Day Trip Near Pune: दिवाळीत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा आहे का? पुण्याजवळील हे ७ पिकनिक स्पॉट्स सिंहगड, मुळशी, खडकवासला आणि आणखी बघा.
Pune Tourism
Diwali trip near Punegoogle
Published on
Pune picnic spots
Pune picnic spotsgoogle

दिवाळीच्या सुट्टीत एकदिवसाची छोटी ट्रिप करायची प्लॅनिंग करायची असेल तर बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात राहणाऱ्यांसाठी विकेंड गेटवे म्हणजे फार लांब प्रवास नाही. काही किलोमीटरच्या अंतरावरच हिरव्या डोंगरदऱ्या, शांत तलाव आणि निसर्गाच्या सान्निध्यातील ठिकाणं अनुभवायला मिळतात. जर तुम्हाला शांत वातावरण, निसर्ग आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा असेल, तर पुण्याजवळील ही सात ठिकाणं तुमच्यासाठी खास आहेत.

one day trip near Pune
one day trip near Punegoogle

यवत 24 फार्म

यवत 24 फार्म हे पुणे-सोलापूर हायवेवर असलेलं 25 एकरांचं सुंदर ऑर्गेनिक फार्महाऊस आहे. ईथे तुम्हाला आंबा, नारळ, चिंच, संत्री यांसारख्या झाडांच्या बागा पाहायला मिळतील. इथे सगळी फळं 100% सेंद्रिय पद्धतीनं पिकवली जातात. फार्मवर मिळणारं शाकाहारी जेवण त्यांच्या स्वतःच्या शेतातील भाज्या, फळं आणि डेअरीतील ताज्या दुधापासून तयार केलं जातं.

Sinhagad Fort
Sinhagad Fortgoogle

सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला हा पुण्यापासून सुमारे 49 किमी अंतरावर आहे. इतिहासप्रेमी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांचं हे आवडतं ठिकाण आहे. पावसाळ्यात हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला हा किल्ला अप्रतिम दिसतो. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर गरमागरम भाकरी, ठेचा आणि कांदा भजीचा आस्वाद घेणं ही सिंहगडची खासियत आहे.

historical places Pune
historical places Punegoogle

राजीव गांधी प्राणीसंग्रहालय

कात्रज येथे, पुण्यापासून फक्त 8 किमीवर आहे. प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी आणि मुलांसाठी हे ठिकाण आदर्श आहे. येथे वाघ, साप, पक्षी आणि विविध वन्यप्राणी पाहायला मिळतात. पांढरा बंगाल वाघ ‘तानाजी’ आणि 13 फुटांचा किंग कोब्रा हे येथील आकर्षण आहे.

Baneshwar temple
Baneshwar templegoogle

बाणेश्वर मंदिर

बाणेश्वर मंदिर हे नरसापूर गावाजवळ, पुण्यापासून 36 किमीवर आहे. जंगलात दडलेलं हे प्राचीन मंदिर शांततेसाठी आणि अध्यात्मिकतेसाठी प्रसिद्ध आहे.

Khadakwasla Dam
Khadakwasla Damgoogle

खडकवासला धरण

खडकवासला धरण हे पुण्यापासून फक्त 21 किमीवर आहे. मुठा नदीवरील हे धरण पावसाळ्यात अत्यंत निसर्गरम्य दिसतं. कुटुंबांसोबत बसून स्नॅक्स खाणं, घोडे स्वारी करणं किंवा तलावाच्या काठावर निवांत बसून दृश्यांचा आनंद घेणं सगळंच अनुभवता येतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com