डोळ्यांत राग, आक्रमक बाणा, राहुल-प्रियंका गांधी जमिनीवरच झोपले, पोलिसांनी उचलून बसमध्ये टाकलं, दिल्ली आंदोलनातील 6 PHOTO

Rahul Gandhi Jantar Mantar March Opposition Protest Delhi: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये आंदोलन केलं. पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतलं, तर प्रियंका गांधी यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं.
RAHUL GANDHI PRIYANKA GANDHI DETAINED IN DELHI PROTEST OVER GYANESH KUMAR
RAHUL GANDHI PRIYANKA GANDHI DETAINED IN DELHI PROTEST OVER GYANESH KUMARsaam tv
Published on: 
rahul gandhi
rahul gandhi saam tv

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून इंडिया आघाडीचे खासदार आज पुन्हा आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदार जंतर-मंतरच्या दिशेने निघाले.

india aghadi allince
india aghadi allincesaam tv

राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे शेकडो खासदार तीन बसमधून जंतर-मंतरच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी भाजप आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

rahul gandhi
rahul gandhi saam tv

खासदारांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी बसेस अडवल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांसह पायी जंतर-मंतरकडे जाण्याचा निर्णय घेतला.

congress news
congress news saam tv

पोलिसांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखल्यानंतर प्रियंका गांधी यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्या रस्त्यावर झोपल्याचंही पाहायला मिळालं. यावेळी प्रियंका गांधी यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला.

election commision
election commision saam tv

दरम्यान, जंतर-मंतरकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे इंडिया आघाडीच्या आंदोलनाला आता आणखी आक्रमक वळण मिळालं आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com