Mumbai Grant Road News : मुंबईत इमारतीचा स्लॅब आणि बाल्कनी कोसळली; दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू

Mumbai Grant Road News update : मुंबईत ग्रँट रोड परिसरात एका इमारतीचा स्लॅब आणि बाल्कनी कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे.
grant road rain
Grant Road News Saam tv
Published on
grant road
Grant Road News update Saam tv

मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहेत. याचदरम्यान, एक दुर्घटना घडली आहे.

grant road building
Grant Road News Saam tv

मुसळधार पावसाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. या मुसळधार पावसादरम्यान ग्रँट रोड परिसरात एका इमारतीचा स्लॅब आणि बाल्कनी कोसळल्याची घटना घडली आहे.

grant road News in marathi
Grant Road Saam tv

या बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनेमुळे इमारतीमधील नागरिकांची एकच धावाधाव झाली.

grant road news update
Mumbai Grant Road News Saam tv

ग्रँट रोड परिसरात रुबिनिसा मंजिल इमारतीची बाल्कनी कोसळल्याची घटना घडली.

Mumbai grant road News
mumbai Saam tv

या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनी आणि स्लॅबचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत.

Mumbai news update
Mumbai news updateSaam tv

इमारतीच्या बाल्कनी आणि स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. या इमारतीला म्हाडाने नोटीस बजावली होती.

Grant road rain
mumbai Saam tv

इमारती बाल्कनी आणि स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या जवानांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने मदतकार्याला सुरुवात केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com