Border 2 OTT: बॉर्डर 2 कोणत्या OTT वर पाहता येणार? लगेचच वाचा...

Sunny Deol Latest Movie: सनी देओल आणि वरुण धवन यांचा ‘बॉर्डर 2’ बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून, हा चित्रपट मार्च २०२६ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Border 2 Netflix Streaming
Border 2 OTT Releasegoogle
Published on
Border 2 Netflix Streaming
Border 2 Netflix Streaminggoogle

सनी देओल आणि वरुण धवन यांचा गाजणारा ‘बॉर्डर 2’ सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रचंड यश मिळवत आहे. २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Border 2 Movie Update
Border 2 Movie Update

देशभरात थिएटरमध्ये ‘बॉर्डर 2’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहाला मिळाली. तसेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग हक्क Netflix ने खरेदी केले आहेत. अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बॉर्डर 2’ २० मार्च २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे.

Border 2 OTT Release
Border 2 OTT Releasegoogle

साधारणपणे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ८ आठवड्यांनी ओटीटीवर रिलीज होतो. त्याच नियमानुसार मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट घरबसल्या पाहता येईल. निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी ओटीटी रिलीजबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Border 2 OTT Release
Border 2 OTT Releasegoogle

अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल लेफ्टनंट कर्नल फतेह सिंह कलेर यांच्या भूमिकेत, तर वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या दमदार भूमिकेत पाहायला मिळाले आहेत.

Border 2 OTT Release
Border 2 OTT Release

बॉक्स ऑफिसबाबत बोलायचे झाले तर, ‘बॉर्डर 2’ हा २०२६ मधील बॉलिवूडचा पहिला ब्लॉकबस्टर ठरला असून, दोन आठवड्यांत २७५ कोटींचे बजेट वसूल करत जागतिक स्तरावर ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com