Suraj Chavan: खेडेगावातून थेट 'बिग बॉस'च्या घरात, सूरज चव्हाणचा गोलीगत प्रवास!

Bigg Boss Contestant Suraj Chavan : सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरामध्ये पोहचण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. खूप कष्ट करून तो इथपर्यंत पोहचलाय.
Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media
Published on
Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media

सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरामध्ये पोहचण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. खूप कष्ट करून तो इथपर्यंत पोहचलाय.

Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media

सूरज चव्हाण मूळचा पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या मोढवे या गावचा रहिवासी आहे. सूरजला ५ मोठ्या बहिणी आहेत, असं त्याने बिग बॉसच्या घरात सांगितले.

Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media

सूरज लहान असतानाच त्याचे आई-वडील वारले. त्यामुळे सूरज आता त्याच्या मोढवे येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी राहतो.

Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media

सूरजच्या घरची परिस्थिती खूप हालाकिची होती. त्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. सूरज चव्हाण जे मिळेल ते काम करत बहिणीला मदत करत होता.

Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media

सूरजच्या बहिणीच्या मुलाने त्याचा एक व्हिडीओ मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या पहिल्याच व्हिडीओला खूप चांगले लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले होते.

Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media

त्यानंतर त्याने एकापोठापाठ एक व्हिडीओ शेअर केले. त्यामुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळत गेली. सूरजने एक सेकंड हँड मोबाईल खरेदी करून व्हिडीओ तयार करायला सुरूवात केली.

Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media

सूरजने टिकटॉकवर व्हिडीओ शेअर केले होते. बघता बघता सूरज टिकटॉक स्टार झाला. त्याचे २ मिलियन फॉलोअर्स होते. सूरजची सगळीकडे चर्चा होऊ लागली.

Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media

सूरजला दुकानांच्या उद्घाटनासाठी बोलावले जात होते. त्यासाठी त्याला ८० हजार रुपये मिळत होते. आता तो ३० ते ५० हजार रुपये कमावतो.

Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media

टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजने युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकण्यास सुरूवात केली. याठिकाणी त्याचे चांगले फॉलोअर्स आहेत.

Suraj Chavan
Suraj ChavanSocial Media

'बिग बॉस'च्या घरामध्ये पहिल्याच एलिमिनेशन राऊंडमध्ये सूरज चव्हाण पहिला स्पर्धक आहे जो सेफ झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com