अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण हे सध्या त्यांच्या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी या दोघांनी बीचची निवड केलीय.
बीचवरील पूजा आणि सिद्धेशचं फोटोशूट समोर आलंय. सध्या हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
रोमॅन्टिक पोज देत या दोघांनी फोटोशूट केलंय. पूजा- सिद्धेशची बीचवरील मस्ती चांगलीच व्हायरल होतेय.
मराठी अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण २८ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यांचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं होतं.
पूजा कलरफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना नेहमीच वेड लावलंय.
समुद्राचं निळं पाणी आणि पांढरंशुभ्र आकाश, असं वातावरण फोटोंमध्ये दिसतंय. सध्या पूजा सिद्धेशकडे क्यूट कपल म्हणून बघितलं जातं.