आज प्रत्येक व्यक्तीच्या घरात गॅस सिलिंडर पोहचले आहेत. प्रत्येक घरात गॅसवरच जेवण बनवले जाते.
गॅसवर काही पदार्थ बनवत असताना आपल्याला काही वेळा गॅस शेगडीमध्ये विघाड होतो.
अनेकदा गॅस शेगडीची फ्लेम कमी होते. फ्लेम कमी झाल्याने पदार्थ लवकर शिजत नाहीत.
तुम्हाला माहितीये का? गॅसची फ्लेम स्लो झाली असेल तर ती घरच्याघरी दुरुस्त सुद्धा करता येते.
त्यासाठी सर्वात आधी गॅसचा बर्नर साफ करून घ्या.
गॅसचा बर्नर आणि गॅस शेगडीचे बटन देखील खोलून तुम्ही ते साफ करू शकता.
अनेकदा गॅस पाईपलाइन दाबली जाते किंवा त्यात काही बिघाड होतो. त्यामुळे गॅस पाईपलाईन सुद्धा तपासा.
सिलिंडर जेव्हा संपत येतो तेव्हा पण गॅसची फ्लेम फार स्लो वाटते. त्यामुळे गॅस संपत आला आहे का तपासा.
टीप : ही सर्व सामान्य माहिती आहे. आम्ही या माहतीचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.