सध्या लोक गुंतवणुक करण्याकडे जास्त भर देताना पाहायला मिळत आहे.
LIC पॉलिसी घेताना महत्वाची माहिती लपवणे हे अत्यंत चुकीचे आणि धोकादायक असू शकते.
तुम्हाला याचे उदाहरण पाहायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अलीकडच्या निकालातून काही माहिती समोर आले आहे.
हरियाणातील महिपाल सिंग यांनी 2013 मध्ये जीवन आरोग्य योजना घेतली होती. मात्र त्यांनी दारूच्या व्यसनाबद्दल माहिती लपवली.
एका वर्षात त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीने क्लेम केला, पण एलआयसीने नाकारला.
जिल्हा आणि राज्य ग्राहक आयोगांनी दाव्यास मान्यता दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एलआयसीच्या बाजूने निर्णय दिला.
न्यायालयाने स्पष्ट केले की जर लपवलेली वस्तुस्थिती मृत्यूचे कारण ठरली, तर दावा देणे बंधनकारक नाही. हा निकाल विमा धारकांसाठी गंभीर इशारा ठरला आहे.