LIC Policy : गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! एलआयसीकडून सरकारला ७,३२४ कोटींचा लाभांश

Dividend : भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला तब्बल ७,३२४ कोटी रुपयांचा लाभांश चेक दिला असून कंपनीची मालमत्ता ५६.२३ लाख कोटींवर पोहोचली आहे.
LIC policy
LIC policySaam tv
Published on
LIC Policy
LIC PolicySaam Tv

भारतीय जीवन विमा महामंडळाने म्हणजेच LIC ने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना ७,३२४.३४ कोटी रुपयांचा लाभांश धनादेश जाहीर केला आहे.

LIC Policy
LIC PolicySaam Tv

LICने २६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा डिविडेंड चेक मंजूर केला आहे.

LIC Policy Jeevan Anand
LIC Policy Jeevan Anand

त्यावेळेस LICचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आर. दोराईस्वामी, वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू, संयुक्त सचिव प्रशांत कुमार गोयल तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LIC investment risks
LIC PolicySaam Tv

३१ मार्च २०२५ पर्यंत LICची मालमत्ता तब्बल ५६.२३ लाख कोटी रुपये झाली असून कंपनी जीवन विमा क्षेत्रात आघाडीवर आहे.

LIC News
LIC Scheme Saam tv

गुंतवणूकदारांसाठी LICने यापूर्वी जुलै २०२५ मध्ये एक्स-डिव्हिडंड व्यवहार केला होता. त्यामध्ये प्रति शेअर १२ रुपयांचा डिविडेंड चेक जाहीर केला होता.

LIC Jeevan Labh Scheme
LIC Jeevan Labh SchemeSaam Tv

यापूर्वी २०२४ मध्ये कंपनीने दोनदा डिविडेंड चेक दिला होता.

LIC insurance
InvestmentSaam Tv

LICने आतापर्यंत पाच वेळा गुंतवणूकदारांना डिविडेंड चेकचा लाभ दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी LIC चा शेअर २ टक्क्यांनी घसरून ८५२.२५ रुपयांवर बंद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com