Skin Care Tips: नववर्षी त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या योग्य स्किन केअर टिप्स

Skin Care Tips Benefits: नववर्षात त्वचेसाठी नवीन काळजी दिनचर्या स्वीकारा. यामुळे त्वचा निरोगी होईल आणि दैनंदिन जीवनात ताजेपणा व उत्साहाची भावना निर्माण होईल.
Skin Care Tips
Skin Care Tipsyandex
Published On

नववर्ष हे नवीन सुरुवातीचे प्रतीक असून, यावेळी आपण जुने वर्ष निरोप देत भविष्याकडे नवीन आशा आणि ध्येयांसह वाटचाल करतो. नववर्षाच्या दिवसाला विशेष महत्त्व असते कारण यावेळी लोक भूतकाळातील अनुभवांपासून शिकून नव्या संकल्पांसाठी प्रेरणा घेतात आणि जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतात. कौटुंबिक गेट-टूगेदर, पार्टी आणि सणांचा आनंद घेऊन ते हा दिवस साजरा करतात.

यासोबतच, ही वेळ जुने वाद आणि नकारात्मकता मागे सोडून सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्याची असते. वर्षाच्या सुरुवातीला लोक नवीन संकल्प करतात. या संकल्पांमध्ये त्वचेची काळजी घेण्याचा निर्धारही केला जाऊ शकतो. जर तुम्हाला तुमची त्वचा वर्षभर चमकदार, निरोगी आणि तजेलदार ठेवायची असेल, तर सुरुवातीपासूनच योग्य स्किन केअर रूटीनचा अवलंब करा.

Skin Care Tips
Weight Loss: नवीन वर्षात फार्मा क्षेत्रात मोठे विस्तार, वजन कमी करणारी गोळी होणार उपलब्ध
Skin Care Cleanser
Skin Care Cleanseryandex

सर्व प्रथम योग्य क्लीन्सर खरेदी करा

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा सौम्य आणि गुणवत्तेचे क्लिन्झर वापरा. कोरडी त्वचेसाठी हायड्रेटिंग आणि तेलकट त्वचेसाठी ऑइल कंट्रोल क्लीन्सर वापरा, त्वचेला ताजेतवाने आणि निरोगी ठेवण्यासाठी.

Skin Care Tips
Hair Care Tips: सावधगिरी बाळगा! जर तुम्ही हिवाळ्यात हेअर ड्रायरने केस कोरडे करत असाल तर त्याचे होते मोठे नुकसान
Skin Care Toner
Skin Care Toneryandex

टोनर खरेदी करा

क्लीन्झरने चेहरा स्वच्छ केल्यानंतर चांगला टोनर वापरा, ज्यामुळे छिद्र घट्ट होतात आणि त्वचा ताजीतवानी होते. गुलाबपाणी देखील वापरू शकता, जे त्वचेला हायड्रेट आणि शांत करते.

Skin Care Moisturizer
Skin Care Moisturizeryandex

मॉइश्चरायझर

दिवसातून दोन वेळा (सकाळी आणि रात्री) त्वचेला मॉइश्चरायझर आवश्यक आहे. कोरडी त्वचेसाठी ऑइल बेस्ड आणि तेलकट त्वचेसाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरा, ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहील.

Skin Care Tips
Travel Tips : लहान मुलांसोबत प्रवास करताय 'या' गोष्टी आवश्य करा, जाणून घ्या टिप्स
Skin Care Scrubing
Skin Care Scrubingyandex

स्क्रबिंग करा

आठवड्यातून एक किंवा दोनदा हलक्या स्क्रबने त्वचा एक्सफोलिएट करा. यामुळे मृत पेशी काढून टाकता येतात, ज्यामुळे त्वचा उजळते आणि पुनरुज्जीवन होतो.

Night Skincare Routine
Night Skincare Routineyandex

नाईट स्किनकेअर रूटीन

रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे धुवा आणि नाईट क्रीम किंवा सीरम वापरा, ज्यामुळे त्वचा रात्रभर हायड्रेट राहील. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ही स्किनकेअर दिनचर्या अंगीकारल्याने तुमच्या त्वचेला उत्तम आणि ताज्या सुरुवातीची संधी मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com