आता वाण सामानांपासून ते मोठ्या बॅंकांच्या व्यवहारामध्ये UPI पेमेंटचा वापर केला जातो.
UPIचे व्यवहार करताना आपण सेंकदात QR कोड स्कॅन करुन पैसे पाठवतो.
बऱ्याच वेळेस आपण UPI पेमेंट चुकीच्या व्यक्तीला करतो. अशा वेळेस गोंधळात न जाता पुढील टिप्सचा वापर करु शकतो.
पेमेंट करताना बऱ्याचदा चुकीच्या नंबरवर पैसे पाठवणे, रकमेतला एखादा शुन्य जास्त पाठवणे अशा समस्या येतात.
तुम्ही चुकीच्या नंबरवर पैसे पाठवले असतील तर लगेचच तुमच्या अॅपमधली हिस्ट्री तपासा. त्यामधला UTR नंबर नोट करा. मग UPI अॅपच्या कस्टमर सपोर्टला कॉल करा.
पुढे त्यांना चुकीच्या ट्रांजेक्शनचे रिपोर्ट करुन पैसे परत मिळवा. असे नसेल होत तर पुढील मार्ग वापरा. तुम्ही थेट तुमच्या बॅंकेत जाऊन ट्रांजेक्शन आयडी आणि तारिख तपासू शकता. त्यांना रिक्वेस्ट केल्याने तुमचे काम सोपे होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.