खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.
वाढत्या वयात डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे या समस्येने अनेजण त्रस्त आहेत.
डोळ्यांना खाज येणे, जळजळ होणे तसेच डोळ्यांना सतत चोळल्याने डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात.
ॲलर्जीमुळे त्वचेवर परिणाम होतो ज्यामुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसतात.
अशक्तपणा आल्यास शरीरात लोहाची कमतरता जाणवते यामुळे शरीरातील लाल पेशींची संख्या कमी झाल्याने त्वचेचा रंग फिकट होतो व डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागतात.
जीवनसत्त्व क आणि बी १२ सारख्या आवश्यक पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्या कमकुवत होऊ शकतात आणि रक्ताभिसरण बिघडू शकते,ज्यामुळे डोळ्यांखाली काळा रंग किंवा वर्तुळे येतात.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने शरीर डिहायड्रेट होते व त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे स्पष्ट दिसतात.
सतत फोन तसेच स्क्रिन जास्त तास बघितल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि थकवा येऊ शकतो. तसेच डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात.