सोनम कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकसाठी जास्त चर्चेत असते. सोनमने अभिनयापेक्षा तिच्या लूकसाठी जास्त प्रसिद्धी मिळवली आहे.
अलीकडेच सोनमने तिच्या इंस्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो शेअर केलेत, यामध्ये ब्रँड कॅरोलिना हेरेरा कलेक्शनच्या फ्लोरल गाऊनमध्ये दिसतेय.
सोनमचा हा गाऊन शिफॉन फॅब्रिकपासून तिची बहीण रिया कपूर आणि स्टायलिश अभिलाषा देवनानी यांनी स्टाईल केलाय. या हॉल्टर नेक गाउनमध्ये फ्लोरल डिटेलिंग दिसत आहे.
या वनपीसवर गुलाबाची आणि हिरव्या रंगाच्या पानांची प्रिंट आहे. या ड्रेसची किंमत ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर पाच लाख रूपये देण्यात आलीय.
सोनमने या गाऊनसोबत एक हॅंड बॅग देखील कॅरी केलीय. त्या बॅगची किंमत ४ लाख ७७ हजार रूपये असल्याचं सांगितलं जातंय.
सोनमने या ड्रेससोबत मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे. तिने स्टेटमेंट कानातले आणि अंगठी घातलीय. यामध्ये हिरवा रंग हायलाइट होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.