Sonam Kapoor Fitness : सोनम कपूरचा फिटनेस मंत्र...

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor FashionInstagram/ @sonamkapoor
Published on
Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor FashionInstagram/ @sonamkapoor

सोनम कपूर किती फिट आहे? नेमकं काय खाते? असा प्रश्न तिच्या असंख्य चाहत्यांना पडला होता. याच उत्तर सोनमने खुद्द व्हिडिओद्वारे दिलं.

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor FitnessInstagram/ @sonamkapoor

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सोनमचा आहार नेमका काय असतो? हे सगळंच तिने या व्हिडिओतून सांगितलं आहे. चला तर मंडळी जाणून घेऊयात तिच्या आहाराविषयी

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor StyleInstagram/ @sonamkapoor

सकाळी उठताच सोनम प्रथम लिंबू पाणी पिते. त्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण नियंत्रित राहतं. त्वचेसाठी उपयुक्त 'क' जीवनसत्त्वही मिळतं आणि विषारी घटक शरीराबाहेर पडायला मदत होते.

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor LookInstagram/ @sonamkapoor

त्यानंतर कोलेजन चॉकलेट कॉफी घेते. या कॉफीमुळे तिची त्वचा, नखं, केस चमकदार राहतात आणि सांधेही मजबूत राहतात. तसंच तारुण्य टिकून राहतं.

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor GlamourousInstagram/ @sonamkapoor

सोनम नाश्ता काय करते? तर सकाळी नाश्त्याला ती अंड आणि टोस्ट खाते. प्रोटीनसाठी अंड हा उत्तम पर्याय असल्याने ती आवर्जून अंड खाते.

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor Fitness BeautifulInstagram/ @sonamkapoor

दुपारच्या जेवणात सोनम अधिक पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचा समावेश करते. यात पास्ता असतो शिवाय चिकनपासून बनवलेले विविध पदार्थ ती खाते.

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor GlowInstagram/ @sonamkapoor

या पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर करते कारण त्यापासून 'क' जीवनसत्त्व मिळतं आणि चवही वाढते.

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor DressInstagram/ @sonamkapoor

जेवणानंतर संध्याकाळी छोटीशी भूक सतावते त्यावेळी सोनम चव आणि प्रोटीन देणाऱ्या चिकन टोस्टचा आस्वाद घेते तसंच शरीराची अँटी ओक्सिडंटची गरज भागवण्यासाठी दही खाणं, सोनम पसंत करते.

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor LookInstagram/ @sonamkapoor

रात्री लवकर जेवावं असं सर्वच सांगतात. हाच नियम स्वतः सोनम कटाक्षाने पाळते. रात्री खाल्लेलं अन्न नीट पचावं म्हणून ती फक्त सूप पिते. पोटही भरतं आणि पचतं.

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor PhotosInstagram/ @sonamkapoor

आता सर्वात महत्वाचा सल्ला तो म्हणजे शारीरिक आरोग्य चांगलं राहावं, यासाठी आवश्यक तितकं पाणी प्या. शरीर तजेलदार ठेवायचं असेल, हायड्रेटेड ठेवायचं असेल तर किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावं, असा सोनमचा सल्ला आहे. त्यामुळे दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहू शकता.

Sonam Kapoor Fitness
Sonam Kapoor PicsInstagram/ @sonamkapoor

तर मंडळी, सोनम कपूर तिच्या फिटनेससाठी आपल्याला परिचित आहे पण यासाठी ती काय खाते, हे तिने आपल्याला सांगितलं. तर मग तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, सकस खा, पाणी प्या आणि फिटनेस जपा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com