आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो वारकरी शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. विठू- रखुमाईच्या नामाचा जयघोष करत हे वारकरी पुढे चालले आहेत.
वारकऱ्यांसह सर्वच भक्तांना आता विठुरायाच्या दर्शनाची प्रचंड ओढ लागलीय. या वारीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील सहभागी झाले होते.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसोबत चालत श्रीकांत शिंदें पायी चालत वारीत सहभाग झाले होते. त्यांनी ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचं दर्शन घेतल्याचे फोटो समोर आले होते.
यावेळी खासदार शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेतला. टाळ वाजवत त्यांनी सर्व वारकरी बांधवांसोबत विठ्ठनामाचा जयघोष केला.
संत तुकोबा माउली आणि संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी एकत्र येतात. सर्वजण अगदी जल्लोषात पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करतात.
महाराष्ट्राला वारीची परंपरा लाभलेली आहे. या वारीत अनेक मान्यवर मंडळी, नेतेमंडळी देखील आवर्जून सहभाग होताना नेहमीच दिसतात.
आषाढी एकादशीनिमित्ताने निघालेल्या वारीत सध्या उल्हासाचं वातावरण आहे. पंढरीचे वारकरी आता हरीनामाच्या गजरात विठ्ठलमय झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.