लग्नानंतर अदिती- सिद्धार्थ पहिल्यांदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यात हे नवविवाहीत जोडपं एकत्र दिसले. त्यात अदितीचा चेहरा लग्नानंतर आणखी खूललेला दिसला. तिच्या तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. त्याचसोबत भांगेत सिंदूर आणि हातात बांगड्या होत्या.
अदिती-सिद्धार्थ हातात हात घेवून एकत्र येताना दिसले. १७ सप्टेंबरला हे दोघे विवाह बंधनात अडकले होते. या दोघेही बराच काळ रिलेशनशिप मध्ये होते. अदितीचा हा दुसरा विवाह आहे.
हे दोघे विवाहानंतर मुंबईला गुरूवारी परतले तेव्हा विमानतळावर चाहत्यांना ते एकत्र पाहायला मिळाले. सिद्धार्थ त्यावेळेस कूल लूकमध्ये चाहत्यांना दिसला. तिथे पापाराझींना ते दोघे भेटले.
त्यावेळेस पापाराझींनी त्यांना "मिठाई कूठे आहे?" असा प्रश्न देखील विचारला. त्यावर नवी नवरी म्हणाली" उद्या सगळ्यांना मिठाई मिळणार आहे."
काही महिन्यांपुर्वी आलेल्या हीरामंडी या वेबसिरीजमध्ये या कपलने एकत्र काम करून चाहत्यांचं मनं जिंकलं होत. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये हे दोघे ही आपाल्या पद्धतीने चांगलेच काम करून नाव कमवत आहेत.
२८ मार्च रोजी सिद्धार्थ- अदिती यांनी एंगेजमेंटची अधिकृत घोषना केली होती.त्यांनतर त्यांचा विवाह संपन्न झाला.
अदिती-सिद्धार्थ यांचं लग्न अगदी पारंपारिक पद्धतीने पार पडलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडीयावर चांगलेच चर्चेत होते. त्यात ते दोघे ही साध्या पण सुंदर अश्या पद्धतीने तयार झाले होते. त्यांचा पोशाख पांढऱ्या रंगाचा होता.
अदितीने सोनेरी पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती आणि गजरे माळले होते. सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. असा त्यांचा विवाह पार पडला.
Edited By : Sakshi Jadhav