
आजचे पचांग
बुधवार,२३ जुलै २०२५,आषाढ कृष्ण पक्ष,शिवरात्रि.
तिथी-चतुर्दशी २६|२९
रास- मिथुन
नक्षत्र-आर्द्रा
योग-व्याघात
करण-विष्टीकरण
दिनविशेष-चतुर्दशी वर्ज्य
मेष - नवीन आव्हाने स्वीकारायला आपल्याला नेहमीच आवडते मग कोणाची साथ असो म्हणून आपण यशाच्या झेंडा फडकवणार हे नक्की. वाटेत येतील त्या सत्यात गोष्टी उतरवा.
वृषभ- वडिलोपार्जित संपत्ती बाबत अडकून पडलेल्या गोष्टी आज चुटकीसरच्या सुटतील आपल्याच घरातील व्यक्तींच्या सहकार्यामुळे मार्ग निघतील. व्यवसायामध्ये मात्र जपून पावले टाकावीत.
मिथुन - आनंदी आणि गुलछबू असणारी आपली रास आहे . नेहमीप्रमाणे सहज असा दिवस आज जाईल. मौज, मजा, मस्करी यामध्ये तुम्हाला विशेष आनंद वाटतो. आपल्या लोकांना मात्र तुमच्यामुळे सकारात्मकता मिळेल.
कर्क - सगळे काही छान चालू असताना अचानक माशी शिंकते असे काही ज्या घटना आज घडतील. विनाकारण पैसा खर्च होईल. पैशाचा हिशोब न लागल्यामुळे हातबलता निर्माण होईल.
सिंह- सोप्या गोष्टी अजून सोप्या होतील असा काहीसा दिवस आहे. पण आपली धावपळ आणि धडपड ही सुद्धा वाढेल. मोठ्या मुदतीच्या गोष्टींमधील पैशाची केलेल्या गुंतवणुकी मधून आज लाभ मिळतील.
कन्या - सामाजिक कार्यात आपला विशेष रस आहे आणि आज तो वाढता राहील. आपल्या वरिष्ठानकडून विशेष कौतुक होईल. बौद्धिक गोष्टी मध्ये आघाडीवर रहाल. आपला सल्ला इतरांना फायदेशीर ठरेल .
तुळ - लक्ष्मी उपासना फलदायी ठरणार आहे. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. दानधर्मामध्ये सुद्धा तेवढ्याच हिरीरीने सहभाग घ्याल. भाग्यकारक घटना घडतील. नातवंड सौख्य उत्तम राहणार आहे. घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
वृश्चिक - अडचणींचा सामना करत आजकाल दिवस खूप जात आहेत. एखादा दिवस तरी मनासारखा असावा असे वाटतं. पण आज काही गोष्टी अशा घडतील ज्या भावतील. जोडीदाराची साथ सुद्धा तुम्हाला चांगली मिळेल. कोर्टाच्या कामात यश आहे.
धनु - नोकरी व्यवसायात गती आणि प्रगती होणार आहे. ठरवून केलेल्या गोष्टी होत असताना अडचणींचा सामना करावा लागेल. आजोळी, मामाकडून फायदा संभवतो आहे.
मकर - नव्याने गोष्टी साकारण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन कल्पना सुचतील. सृजनशीलता वाढेल. कलात्मक कार्यामध्ये विशेष रस घ्याल. एखादे काम सहज होताना दिसेल. उपासना यासाठी फायदेशीर ठरेल.
कुंभ - गुरे ढोरे शेतीवाडी याच्या क्रयविक्रियांमध्ये फायदा होईल. मातृसौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. प्रेम असेल तर सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात हे आज जाणवेल. कुटुंबियांची विशेषण थाप आपल्या पाठीवर आज असेल.
मीन - "जे असेल ते असेल नसेल तरी नसेल" आज कोणत्याच गोष्टीविषयी आपली तक्रार राहणार नाही. नवीन गोष्टी मात्र करण्यात आज आघाडीवर असाल. पराक्रमाचा दिवस आहे इतरांकडून कौतुक होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.