
आजचे पंचांग
बुधवार,१३ ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष.
तिथी-चतुर्थी ०६|३७
पंचमी २८|२४
रास-मीन
नक्षत्र- उत्तराभद्रपदा
योग- धृति
करण-बालव ०६|३७
कौलव-१७|३१
दिनविशेष-क्षयतिथी
मेष- परदेशात जाण्याची इच्छा असेल तर नव्याने या निगडित बैठका होतील. काहीतरी प्लॅन केले जातील योग्य तो मार्ग निघेल. मात्र आज कुठल्याही सरकारी कामांमध्ये अडकून राहू नका.त्यात फसण्याची शक्यता आहे.
वृषभ - जुन्या केलेल्या गुंतवणुकी मधून लाभ संभवतो आहे. मग ते पैशाशी निगडित असो किंवा व्यक्तीशी निगडित दोन्ही मधून चांगली फलित आज मिळणार आहेत. दिवस आनंदी राहील .
मिथुन - घोड्यावरून स्वार होऊन आल्यासारखा आजचा दिवस असेल. धावपळ आणि धडपडी मधून यश मिळणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा होईल. पण त्यामधून कळसाध्याय गाठणार आहात. राजकारणात यश आहे.
कर्क - शंकराची उपासना करा.मनस्वास्थ्य राहण्यासाठी आज अनेक गोष्टी करावे लागतील. भाग्यदाराक घटना आज घडणार आहेत. ठरवाल ते कराल आणि ते होईल असा काहीसा दिवस आहे.
सिंह - "नकटीच्या लग्नाला सतराशे साथ विघ्न" असा काहीसा आजचा दिवस आहे. ठरवलेल्या गोष्टी तशा होणार नाहीत. करायला सुरुवात केले की अडचणी येतील. पण त्या पार करून पुढे जाल. पण सहज काही शक्य होणार नाही काळजी घ्यावी.
कन्या - बौद्धिक गोष्टीमध्ये अग्रेसर राहाल. व्यवसायामध्ये नव्या काही गोष्टी अवलंबाल. भरभराटीचे दृष्टीने दिवस चांगला आहे. व्यावसायिक जोडीदाराबरोबर योग्य संगनमत होईल.
तूळ - स्त्रियांना मासिक पाळीच्या तक्रारी वाढतील. ओटीपोटाशी निगडित आजार होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. एकूणच कामाशी वेगळीच धावपळ आहे. दिवस व्यस्त आहे. यश मिळत असल्यामुळे शत्रूंमध्ये सुद्धा वाढ होईल. परिस्थितीशी दोन हात कराल .
वृश्चिक- क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर राहाल. संततीचा वरचढपणा आज मान्य करावा लागेल. काही गोष्टी त्यांच्याकडूनही शिकण्यासारखे असतात. आज त्या अवगत कराल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला आहे.
धनु - घरामध्ये एखादे धार्मिक कार्य होण्याचा संभव आहे. सगळेजण एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणात दिवस व्यस्त राहील. घर, वाहनसौख्य, गुरढोरे, शेतीवाडी यामधून सुखच सुख आज मिळणार आहे .
मकर - नोकरी व्यवसायामध्ये भरभराट होण्याचा आजचा दिवस आहे. जवळच्या प्रवासामुळे मन सुखावून जाईल. कदाचित जुना असलेला शेजाऱ्यांशी किंवा भावंडांशी असणारा अबोला आज संपुष्टात येईल.
कुंभ - नवीन काहीतरी गोष्टींमध्ये रस घेऊन संशोधनात्मक कार्य कराल. जगण्याची वेगळी कला आज अवगत होईल. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. आज हिशोबाने वागाल.
मीन - "केल्याने होत आहे रे आधी केल्याचे पाहिजे" मनामध्ये नवे संकल्प कराल आणि ते सत्यात उतरवाल. कोणत्याही परिस्थितीत आज पाठीमागे जाण्याचा विचार नाही. खंबीरपणे दिवसाला तोंड द्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.