Tuesday Horoscope : शत्रूंचा पाडाव करणार, प्रेमात यश मिळेल; ५ राशींच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस

Tuesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांच्या शत्रूंचा पाडाव होण्याची शक्यता आहे. तर काहींना प्रेमात यश मिळेल.
horoscope in marathi
Horoscope In MarathiSaam tv
Published On

पंचांग

मंगळवार,१८ नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष,शिवरात्रि.

तिथी-त्रयोदशी ०७|१३

रास-तुला

नक्षत्र-स्वाती (अहोरात्र)

योग-आयुष्मान

करण-वणिज

दिनविशेष-त्रयोदशी वर्ज्य

मेष - आजचा दिवस बेरीज वजाबाकीचा म्हणू शकता. म्हणजे काही अधिक उणे असेल.पण एकमेकांच्या समजूतीने पुढे जाल अशी संसारिक आणि व्यवसायामध्ये आपल्या जोडीदाराची साथ मिळणार आहे.

वृषभ - नोकरी नोकरीमध्ये कष्ट केले असतील तर त्याचे फळ आज तुम्हाला मिळेल. अडचणी आल्या तरी त्या बाजूला सारून आपला तुम्ही आज पार पाडाल. शत्रूंचा पाडाव करून आपला मार्ग सुकर कराल .

मिथुन - शेअर्ससाठी, लॉटरी साठी आजचा दिवस चांगला आहे. धनाची निगडित गुंतवणूक करण्यासाठी सुदिन आहे असेच म्हणू शकता. विष्णू उपासना फलदायी ठरणार आहे. प्रेमात यश मिळेल.

horoscope in marathi
Vastu Tips Of Camphor: घरात या ठिकाणी जाळा कापूर, वास्तुदोष होईल दूर, जाणून घ्या फायदे

कर्क - शेतीवाडीच्या कामांमध्ये व्यवहार सकारात्मक होतील. वाहन घर खरेदीसाठी नवीन पाऊल उचलायला आज हरकत नाही. प्रवासाला दिवस चांगला आहे. व्यवसायामध्ये एक टप्पा पुढे यश आहे.

सिंह - मोठ्या महामंडळाच्या सहकार्याने पुढे जाल. जवळचे प्रवास होतील. जे ठरवाल ते करणारच अशी काहीशी जिद्द घेऊन दिवसाची परिणीती होईल.

कन्या - वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी महत्त्वाचे निर्णय होतील. पत्रव्यवहार, कागदपत्रे यांच्याशी निगडित सर्व कामे आज जपून करणे गरजेचे आहे. पुढे फसवणूक होणार नाही ना याची काळजी घ्यावी.

horoscope in marathi
Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वीच निघेल 'दिवाळं', चुकूनही घराला देऊ नका हे रंग, वास्तुदोषाचा करावा लागेल सामना

तुळ- मनोवांछित इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. म्हणूनच चांगले इच्छा मनी धरा त्या नक्की पूर्ण होतील. नव्याने नवे संकल्प घेऊन आजचा दिवस आलेला आहे. त्याचे सार्थक करा.

वृश्चिक- कटकटी अडचणी वाढतील असा काहीसा दिवस वाटतो आहे. आपले महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस सांभाळा. मनोव्यथा जवळच्या व्यक्तीलाच सांगा अन्यथा त्याचा गैर अर्थ काढला जाईल.

धनु - मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात सुख वाटेल. जवळच्या स्नेही आणि परिचिता जवळ स्नेहभोजनाचे योग येणार आहेत. जुन्या केलेल्या गोष्टीतून लाभ मिळतील.

horoscope in marathi
Vastu Tips Of Home Cleaning: रविवारी घराची साफ- सफाई करताय? लादी पुसण्याची योग्य वेळ कोणती?

मकर - सामाजिक क्षेत्रामध्ये वेगळी घोडदौड होईल. कामाच्या ठिकाणी आपण काम केले त्याला योग्य प्रशस्तीपत्र मिळेल. ठरवून केलेल्या गोष्टीत बिनचूक कामे होण्याचा आजचा दिवस आहे.

कुंभ - शंकराची उपासना आज फलदायी ठरेल तीर्थक्षेत्रि भेटी होतील. प्रेमामध्ये यश मिळेल. नातवंड सौख्याला दिवस चांगला आहे. एकूणच सगळे अलबेल वाटणारा आजचा दिवस आहे.

मीन - अनावश्यक पैशाचा आज लोभ टाळणे गरजेचे आहे. एकट्याने काम करून, यश मिळवून कष्टाचा पैसा आज फलदायी ठरेल. इतरांचे उपकार घेऊन कोणतीही गोष्ट करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com