Tuesday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, सासरवाडीकडून धनयोगाचा लाभ दिसतोय; ५ राशींच्या लोकांना सुख समृद्धी मिळणार

Tuesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होण्याची शक्यता आहे. तर काहींना धनयोगाचा लाभ दिसतोय. वाचा मंगळवारचं राशीभविष्य
horoscope in marathi
horoscope Saam tv
Published On

आजचे पंचांग

मंगळवार,१६ सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,दशमी श्राध्द.

तिथी-दशमी २४|२३

रास-मिथुन २४|२९ नं. कर्क

नक्षत्र-आर्द्रा ०६|४६

पुनर्वसु ३०|२६

योग-वरीयान

करण- १२|५४

दिनविशेष-१३ प.चांगला

मेष - नव्याने ओळखी आणि परिचय होण्यासाठी आज दिवस उत्तम आहे. जे ठरवाल ते कराल. मात्र काही जुन्या मित्रांपासून आज काळजी घ्यावी. वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वृषभ - आज वेगळ्याच चार गोष्टी आयुष्यात घडणार आहेत. स्वतःसाठी आणि इतरांसाठी हात सैल सोडून पैसे खर्च कराल. खर्चाला धरबंद राहणार नाही. मोठे काही निर्णय आज मार्गी लागणार आहे.

मिथुन - सोबतीचा करार असल्याप्रमाणे आजचा दिवस आहे. तुमचीच तुम्हाला सोबत आणि संगत आज भावेल. आरोग्य उत्तम राहील. नवनवीन गोष्टी करण्यासाठी उमेदीने झटाल.

horoscope in marathi
Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

कर्क - कुटुंबीयांच्या बरोबर आनंदी क्षण खर्च कराल. सहवासाचे सुख लाभेल. आर्थिक व्यवहारांमध्ये मनाजोगा बदल होईल. दिवस चांगला आहे.

सिंह - जिद्द आणि चिकाटी हे गुण आपल्या राशीचे जणू कणा आहेत. वेगळे सांगण्याची गरज नाही. आज मात्र आपला पराक्रम उत्कृष्ट पातळीवर असेल. वेगळे काहीतरी काम करण्यासाठी पेटून उठाल.

कन्या- बेहिशोबी कोणतेच व्यवहार आपल्याला आवडत नाहीत. झालेल्या गोष्टींचा विचारही अधिक कराल. पण आज चार सुखाचे क्षण झोळीत येणार आहेत. गृहसौख्य, वाहनसौख्य याला दिवस उत्तम आहे.

तूळ - संतती हीच संपत्ती आहे हे आपल्याला कळून चुकले आहे. अवघड असणाऱ्या गोष्टी आज लीलाया पार पाडाल. लक्ष्मीप्राप्तिसाठी उत्तम योग आहेत. विशेष उपासना सुद्धा करावी.

वृश्चिक- रोग, आजार जणू काही पाचवीला पुजले आहेत अशा काही गोष्टी आज तुम्हाला वाटून जातील. एका मागे एक येणाऱ्या संकटांनी जीवाची ओढाताण होईल. पण परिस्थितीशी दोन हात आपल्याला आज करावा लागेल.

धनु - जोडीदाराचे मन जपण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसाय आणि संसार या दोन्हींच्या जबाबदाऱ्या आज पेलताना त्रेधा तिरपीट उडेल. दिवस संमिश्र आहे.

horoscope in marathi
Vastu Tips: या वस्तू कोणाकडूनही फुकट घेऊ नका, अन्यथा वाढेल संकट

मकर - सासरवाडीकडून धन योगाचे लाभ दिसत आहेत. अचानक घबाड मिळाल्यासारखे पैसे आज आपल्याला मिळतील. अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जाल.

कुंभ - मनाचा कोपरा आज भारलेला असेल. भगवंताच्या भेटीसाठी विशेष ओढ वाटेल. दानधर्मामध्ये एक पाऊल पुढे अशी आज तुमची रास आहे. आयुष्यात येणाऱ्या गोष्टींचा आनंद लुटाल.

मीन- एक अधिक एक बरोबर दोन असे आयुष्य खरे तर नसते. अनेक डगरींवर पाय ठेवून जावे लागते. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आज सकारात्मक वृद्धी होणार आहे. कर्माचा लेखाजोखा चांगला राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com