Tuesday Horoscope : अचानक पैसा मिळणार, आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार; 5 राशींच्या लोकांची भरभराट होणार

Tuesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना अचानक पैसा मिळणार. तर काहींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. वाचा मंगळवारचं राशीभविष्य
Tuesday Horoscope in Marathi
Tuesday HoroscopeSaam tv
Published On

पंचांग

मंगळवार,२८ ऑक्टोबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष.

तिथी-षष्ठी ०८|००

नक्षत्र-पूर्वाषाढा

रास-धनु २२|१५ नं. मकर

योग-सुकर्मा

करण-तैतिल

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - मंगळाची ताकद आणि धाडस असणारी आपली रास आहे. लांबचे प्रवास द्रुतगती प्रवास वाहनांवर एक वेगळीच मांड आज आवडेल. कामानिमित्त प्रवास होतील. भाग्यकारक घटनांचा आजचा दिवस आहे.

वृषभ - शुक्र प्रधान असणारी आपली रास. अचानक पैसा मिळण्याचे आज योग आहेत. मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्यायला लागेल. केलेल्या कामाचे लगेच श्रेय मिळेल असा आजचा दिवस नाही.

मिथुन - बुध प्रधान असणारी आपली रास. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. त्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे काम करायला हुरूप येईल. कामाच्या बाबतीत समाधानकारक स्थिती राहील.

Tuesday Horoscope in Marathi
Vastu Tips Of Camphor: घरात या ठिकाणी जाळा कापूर, वास्तुदोष होईल दूर, जाणून घ्या फायदे

कर्क - चंद्र म्हणजे मन मनाशी निगडित असणाऱ्या गोष्टी आज घडतील. काही वेळेला मन उदासीन वाटेल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो आज नकोतच. दैनंदिन कामे सुद्धा रखडण्याची शक्यता आहे.

सिंह - रवी प्रधान असणारी आपली रास. आज तुमच्या मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नव्याने काही परिचय होतील उपासनेला दिवस उत्तम आहे. रवी उपासना करावी.

कन्या - बुधाची आवडती असणारी आपली रास आहे. उत्साह, उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. तुमचे व्यक्तिमत्व बहरत राहील. कुटुंबीय सुद्धा तुम्हाला केलेल्या गोष्टींविषयी पात्र समजतील. दिवस आनंदी आहे.

Tuesday Horoscope in Marathi
Lakshmi Photo Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात आणि ऑफिसमध्ये माता लक्ष्मीचा फोटो कुठे आणि कसा लावावा?

तुळ - शुक्र प्रधान असणारी आपली रास. आज नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. घडलेल्या गोष्टींचे योग्य अवलोकन कराल . पुढील कालावधीचे नियोजन आज योग्य प्रकारे होईल.

वृश्चिक - मंगळाची असणारी आपली रास. व्यावसायिक क्षेत्रामध्ये काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय होतील. कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा सुसंवाद साधून पुढे जाण्याचा योग आहे. दिवस चांगला आहे.

धनु - गुरु प्रधान असणारी आपली रास. आज मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभण्याचा दिवस आहे. काय केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो हे समजून घ्या. सामाजिक कार्यामध्ये प्रतिष्ठान लाभेल.

Tuesday Horoscope in Marathi
Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रानुसार या शुभ वस्तू घरात ठेवा, हातात खेळता पैसा राहील

मकर - शनिचे कारकत्व कायमच आपल्या राशीवर असते . खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काय चुकले काय बरोबर याचा शोध घेण्यात पुढे जाल. त्यामुळे अध्यात्मिक कल वाढेल.

कुंभ - शनीची आवडती असणारी रास आहे. आज वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडतील. मित्र-मैत्रिणींच्या सहवासामुळे पुढे जाल.आरोग्य उत्तम राहील. काळजी नसावी.

मीन - साधा स्वभाव वृद्धिंगत होणारी आपली रास. कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल. राजकीय क्षेत्रात आघाडीवर राहण्याचे योग आहे. लोकांच्याकडून केलेल्या कामाचे प्रशस्तीपत्र मिळाल्यामुळे दिवस आनंदी राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com