Tuesday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागेल; ५ राशींच्या लोकांनी जिभेवर गोडवा ठेवा अन्यथा...

Tuesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तर काहींना जिभेवर गोडवा ठेवावा लागेल. वाचा मंगळवारचं राशीभविष्य
Horoscope News
Horoscope Today Saam tv
Published On

आजचे पंचांग

मंगळवार,५ ऑगस्ट २०२५,श्रावण शुक्लपक्ष,

पुत्रदा एकादशी.

तिथी-एकादशी १३|१३

रास-वृश्चिक ११|२३ नं. धनु

नक्षत्र-ज्येष्ठा

योग-ऐंद्रयोग

करण-विष्टीकरण

दिनविशेष-ज्येष्ठा वर्ज्य

मेष - अवघड गोष्टी सोप्या करून आज कामे करावी लागतील. परिस्थितीशी दोन हात करावे लागेल. शारीरिक मेहनत वाढेल आपला राग आज नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

वृषभ - आपली रसिकता वाढीस लागेल. जोडीदाराबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. आनंदी क्षण उपभोगण्यासाठी आज कशाचाही विचार केला जाणार नाही. दिवस चांगला आहे.

मिथुन - बोलून समोरच्याला आपलेसे कराल. नव्याने काही ओळखी होते पण आपले कोण आणि परके कोण हे ओळखून आज वागणे गरजेचे आहे. तब्येत जपावी.

Horoscope News
Homa Vastu Tips: 'या' झाडांचे सुकणे कधीही टाळा, नाहीतर घरात येऊ शकते दुर्भाग्य

कर्क - भावनिकता असणं हे एका बाजूने चांगले आहे तरी पण त्याचे दुसरी वाईट बाजू सुद्धा आहे. आज मात्र जवळच्या लोकांच्या संबंधात प्रेमाचा वर्षाव होईल मनासारख्या गोष्टी घडतील.धनयोग उत्तम आहेत. एकादशी आहे. विशेष विष्णू उपासना करा.

सिंह - कधी कधी इतरांचे करण्यासाठीच आपला जन्म आहे असे भावना आपल्याला होते. आजही या जबाबदाऱ्या तुम्हाला पेलाव्यालाच लागतील. कुटुंबातील व्यक्तींना भक्कम आधार देण्याचे काम आज तुम्ही कराल.

कन्या - हुशारीने वागणे हे आपल्यासाठी अगदीच सोपे आहे. भावंड सौख्य उत्तम राहील.युक्तिवाद आज तुमच्याकडून घडतील. जवळच्या प्रवासातून फायदा सुद्धा आहे. दिवस उत्तम राहील.

Horoscope News
Vastu For Home: नवीन घर बांधताना 'या' ८ वास्तु नियमांचं पालन करायलाच हवं!

तूळ - लक्ष्मीची कृपा आज आपल्यावर विशेष राहणार आहे.आपली चर असणारी रास आज फिरती, भ्रमंती मधून धनयोग संभवतो आहे. जिभेवर गोडवा ठेवून आज तुम्ही वागाल.दिवस चांगला आहे.

वृश्चिक - एकादशीची सात्विकता आज आपल्यामध्ये रुजेल. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करून वेगाने पुढे जाल. आपल्या जवळचे लोक तुमच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी आज शिकतील. आपले व्यक्तिमत्व प्रभावी आणि उजळलेले राहील.

धनु - मोठ्या प्रवासाचे योग आहेत. नियोजित बैठका पार पडतील. पण शक्यतो दुपारनंतर आयोजित केल्या तर बरे राहील. खर्चाला धरबंद राहणार नाही. हिशोब ठेवून आज वागणे जास्त बरे राहील.

Horoscope News
Home Vastu Tips: घराच्या पायऱ्यांखाली कोणत्या वस्तू ठेवू नयेत? त्रास होण्याची शक्यता

मकर- एकलकोंडा स्वभावामुळे आपल्याच कोशात आज राहण्याचा योग आहे. अवलोकनांमधून नवीन काही गोष्टी शिकाल.मित्रांबरोबर ऊठबस राहील. मात्र अनेक लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे.

कुंभ - संशोधनात्मक कार्य आपल्याला करायला आवडते. सामाजिक कार्यात, राजकारणामध्ये आज आपला वावरसुद्धा राहील. नव्या जुन्याचा मिलाफ करून कृतिशील कल्पनांना वाव मिळेल.दिवस चांगला आहे.

मीन - आज एकादशी निमित्त विशेष उपासना करणे आपल्या राशीला फायदेशीर ठरेल. प्रेमामध्ये उत्तम यश मिळेल. मोठ्या प्रवासा मधून फायदा होईल. भाग्यकारक घटनांचा आजचा कालखंड आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com