

बुध ग्रहाच्या राशी गोचरमुळे काही राशींचं नशीब उजळणार आहे. 29 मे रोजी बुध ग्रह स्वतःच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याच काळात भद्र राजयोगाची निर्मिती होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शुभ आणि प्रभावशाली मानला जातो. विशेष म्हणजे पंचमहापुरुष योगांपैकी हा एक महत्त्वाचा योग समजला जात असल्याने काही राशींच्या लोकांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बुध ग्रह जेव्हा स्वतःच्या मिथुन किंवा कन्या राशीत तसंच केंद्रस्थानी म्हणजे पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भावात स्थित असतो, तेव्हा भद्र राजयोग तयार होतो. बुध हा बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, व्यापार आणि निर्णयक्षमता यांचा कारक ग्रह मानला जातो.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. बुध ग्रह स्वतः मिथुन राशीत आणि लग्न भावात प्रवेश करत असल्यामुळे थेट भद्र राजयोग तयार होईल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. प्रमोशन किंवा पगारवाढीचे योगही दिसत आहेत.
कन्या राशीचा स्वामीही बुध ग्रहच आहे. या गोचरादरम्यान बुध ग्रह कन्या राशीच्या दहाव्या म्हणजे कर्म भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना मनासारखी संधी मिळू शकते.
धनु राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह सातव्या भावात गोचर करणार असून त्यामुळे भद्र राजयोगाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. वैवाहिक आयुष्यातील तणाव कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील.
मीन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह चौथ्या भावात गोचर करणार आहे. हा भाव सुख, मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या काळात नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचा विचार पुढे सरकू शकतो.
Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.