Horoscope 11 July 2024: 'या' राशींना आज लॉटरी लागण्याची शक्यता, तुमचा दिवस कसा जाणार? वाचा एका क्लिकवर

Dainik Rashi Bhavishya: रोज प्रत्येकाचा दिवस ग्रहमानाच्या स्थितीनुसार जातो.आज कुणाच्या राशीमध्ये काय भविष्य लिहिलंय, ते आपण जाणून घेवू या.
Horoscope Today : शासकीय कामात यश मिळेल, आनंद वार्ता कानावर येणार; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Rashi Bhavishya 11th July 2024 :Saam Tv

आजचे पंचांग ११ जुलै २०२४

गुरुवार दिनांक ११ जुलै २०२४, आषाढ-शुक्लपक्ष, तिथी-पंचमी, नक्षत्र-पूर्वा, योग-वरियान, करण-बालव, रास-सिंह, दिनविशेष-चांगला दिवस.

मेष- पैशांची गुंतवणूक

शेअर्समध्ये पैशांची गुंतवणूक किंवा लॉटरी यामध्ये गुंतवणूक आपल्याला फायदेशीर ठरेल. संततीला विशेष सन्मान आणि पुरस्कार मिळतील. कला, मनोरंजन यांसाठी दिवस व्यतीत कराल.

वृषभ- एकूण दिवस बरा

पशुधन हीच खरी संपत्ती ही जाण आज आपल्याला होईल. जागेचे व्यवहार, नवीन गाडी घेण्याचे योग आहेत. एकूण दिवस बरा जाईल.

मिथुन- दिवस छान

भावंड सौख्य चांगले मिळेल. अडचणीच्या वेळी शेजारी मदतीला येतील. लेखन, प्रकाशन यामध्ये कर्तुत्व बहरेल. दिवस छान आहे.

कर्क- नवीन वस्तू खरेदीचे योग

मोठी गुंतवणूक करण्यासाठी आज योग्य दिवस आहे. पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास वृद्धी होईल. नवीन वस्तू खरेदीचे योग आहेत.

सिंह- आरोग्य चांगले राहील

तुमचे व्यक्तिमत्व बहरेल. सकारात्मकता राहील. आरोग्य चांगले राहील. इतरांना आनंद वाटाल. दिवस छान आहे.

कन्या- पैसा खर्च होण्याचा आजचा दिवस

विनाकारण ताण, त्रास, मनस्ताप तसेच अनाठायी पैसा खर्च होण्याचा आजचा दिवस आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, मनस्वास्थ्य जपण्यासाठी उपासना करा.

तूळ- स्नेहभोजनाचे योग

मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. स्नेहभोजनाचे योग येतील. मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी विशेष कष्ट घेण्याची गरज नाही. आजचा दिवस अगदी सहज आहे.

वृश्चिक- दिवस धावपळीचा

कामाला मर्यादा नसतात. ती सातत्याने करायला लागतात हे आज जाणवेल. दिवस धावपळीचा आहे. पण सुकर जाईल. अधिकारपदाचे योग येतील.

Horoscope Today : शासकीय कामात यश मिळेल, आनंद वार्ता कानावर येणार; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Astro Tips: अमरनाथच्या गुहेतील कबुतरांच्या जोडीबद्दलची पौराणिक कथा तुम्हाला माहिती आहे का?

धनु- सामाजिक क्षेत्रामध्ये रस

धर्मासाठी वेगळे काही करावे, ही आज जाणीव राहील. त्या दृष्टीने पावले उचलाल. इतरांना त्यासाठी उद्युक्त कराल. सामाजिक क्षेत्रामध्ये रस निर्माण होईल .

मकर- वाईट गोष्टीत अडकण्याची शक्यता

प्रामाणिक कष्ट आणि मेहनत केली, तर आजचा दिवस हा चांगला जाईल. अन्यथा इतर काही वाईट गोष्टीत अडकण्याची दाट शक्यता आहे. तब्येत जपा.

कुंभ- सकारात्मकतेने पुढे जाल.

कोर्टकचेरीची प्रलंबित कामे मार्गे लागतील. सकारात्मकतेने पुढे जाल. व्यवसायाची निगडित नवीन निर्णय होतील. त्याची सुंदर पाऊलवाट तयार होईल .

मीन- विनाकारण त्रास किंवा अपमान

आजार, कटकटी वाढतील. नोकरीमध्ये विनाकारण त्रास किंवा अपमान सहन करावा लागेल. वस्तू गहाळ होणे अथवा चोरी जाणे याकडे विशेष लक्ष द्या.

ज्योतिषाचार्य अंजली पोतदार

Horoscope Today : शासकीय कामात यश मिळेल, आनंद वार्ता कानावर येणार; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Astro Tips: आषाढ नवरात्री संपण्यापूर्वी 'या' गोष्टी केल्यास तुम्हाला होईल धनलाभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com