Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचा खर्च वाढणार, व्यवहारात सतर्कता बाळगण्याची गरज ; तुमच्या राशीत काय?

Rashi Bhavishya 24 May 2024: दररोज ग्रहमानांची स्थिती बदलत असते. त्यानुसार राशीभविष्य देखील बदलते. आपण आजचे राशी भविष्य जाणून घेऊ या.
राशी भविष्य
Todyas Rashi Bhavishya 21 October 2023Saam TV

आजचे पंचांग २४ मे २०२४

दिनांक- २४ मे २०२४. वार- शनिवार. तिथी- कृ. द्वादशी नक्षत्र- जेष्ठा . योग - सिद्ध. करण- तैतील ०७.१५ नंतर गरज. रास - वृश्चिक १०.३६ नंतर धनू .दिनविशेष - ११ नंतर चांगला.

मेष- वेळेचे नियोजन

"ससा आणि कासव" यांच्या शर्यतीसारखा आजचा दिवस आहे. कितीही धावपळ करून पुढे गेले, तरी पुन्हा जैसे तेच परिस्थिती राहते की काय? असं वाटेल. वेळेचं योग्य नियोजन करा.

वृषभ- व्यवसायाचे नियोजन

व्यवसायासाठी, व्यापारासाठी काही प्रवास होतील. पार्टनरबरोबर पुढील गोष्टींचे छान बेत आखाल. नव्या पद्धतीने व्यवसायाचे नियोजन कराल.

मिथुन- तब्येत आणि मानसिकता जपा

"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" आधी काम करा आणि मगच इतरांना सल्ले द्या. अन्यथा विनाकारण आपण ट्रोल व्हाल. तब्येत आणि मानसिकता दोन्ही जपा.

कर्क- कला कौशल्याची जाणीव

कला कौशल्याची जाणीव खोल राहील. संपत्ती हे सर्वस्व नसून संततीला सर्वस्व मानत त्यांच्यासाठी विशेष गोष्टी कराल. त्यांच्या आनंदात आनंद मानण्यात आज धन्यता वाटेल.

सिंह- मनासारख्या गोष्टी होणार नाही

"कुणी याल का, सांगाल का? सुचवाल का माझ्या मना" आजचा दिवस असा आहे. म्हणजेच केलेल्या कामासाठी घरातल्यांकडूनच शाबासकी आपल्याला हवी असते. त्याची आतुरतेने वाट पाहाल. पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत, हे लक्षात ठेवा.

कन्या - पराक्रम आणि शौर्य

"नन्हें मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्यां हैं ?" असं आज वाटेल. म्हणजे खरंतर पराक्रम आणि शौर्य आपल्याकडेच आहे, फक्त त्याचं योग्य सिंहावलोकन करून हाती आणणं गरजेचं आहे.

तूळ - चांगलं खाण्यापिण्याची आवड

"जिभेची चटक खा बेलाशक' राशीप्रमाणेच शुक्राचा अंमल आज विशेष राहणार आहे. चांगलं खाण्यापिण्याची आवड निर्माण होईल. कुटुंबीयांबरोबर त्या गोष्टी उत्साहाने कराल.

वृश्चिक- धुंदीत राहण्याचा दिवस

"असेल तर असेल नसेल तर नसेल" कोणाकडून "ना अपेक्षा न उपेक्षा" असा आज दिवस. आपल्याच तंद्रीत आणि धुंदीत राहण्याचा आणि दिवस आनंदाने स्वीकाराल.

राशी भविष्य
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

धनु-खर्च होईल

"छन् छन् रुपयां बटवें में बैठा" अशी इच्छा करणे, काही वाईट नाही. पण आज तो दिवस नाही. आज बटव्यामधून पैसे जातील म्हणून उगाच खंत वाटून घेऊ नका.

मकर- परतावा मिळेल

जुन्या इन्व्हेस्टमेंट किंवा पैशाची निगडित काही नियोजन केले असतील तर त्याच्या परताव्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे वेगळे सुख आज उपभोगाल.

कुंभ- कामाचा विशेष ताण

कामाचा विशेष ताण राहील. अधिकाऱ्यांशी बोलणी होतील पण आपले काम इतरांना आवडेल. त्यामधून पुढील इतर कामांचा जबाबदाऱ्या अंगावर येतील.

मीन- स्वतः मधले गुण ओळखा

माशासारखे स्वच्छ आणि कोमल मन आपलं आहे. म्हणूनच मनातल्या गोष्टी इतरांना कळत नाहीत. म्हणतात ना माशाच्या डोळ्याचे पाणी इतरांना दिसत नाही. खरंतर स्वतः मधले गुण ओळखा. आवडतात त्या गोष्टी करा आणि सद्गुरूंना शरण जा.

राशी भविष्य
Rashi Bhavishya : या राशींच्या मनासारख्या घटना घडतील, प्रलंबित कामे होतील पूर्ण; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com