Rashi Bhavishya : या राशींच्या मनासारख्या घटना घडतील, प्रलंबित कामे होतील पूर्ण; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Horoscope Today 21 May 2024 : आजचे राशिभविष्य, २१ मे २०२४ : या राशींच्या मनासारख्या घटना घडतील, प्रलंबित कामे होतील पूर्ण; वाचा संपूर्ण राशिभविष्य
Rashi Bhavishya
Horoscope Today 21th May 2024Saam TV

आजचे पंचांग २१ मे २०२४

वार - मंगळवार. तिथी - शु. त्रयोदशी. नक्षत्र - स्वाती. योग -व्यतिपात. करण - तैतिल. नरसिंह जयंती. रास - तूळ दिनविशेष - १३ नंतर चांगला.

मेष : मनाप्रमाणे निर्णय होईल

आज काही कामे धाडसाने पार पाडाल. व्यवसाय आणि घरामध्ये दोन्हीकडे आपल्या जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कोर्ट कज्जे असतील तर मनाप्रमाणे निर्णय होईल.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल

काही वेळेला आपण विनाकारण कोणाच्या तरी सहकार्याचे अपेक्षा करतो, पण ती आज ठेवू नका. खर्चाचे प्रमाणही वाढते राहील. आजारावर पैसे खर्च होतील.

मिथुन : पैसे गुंतवणूक जपून करावी

आज महत्त्वाच्या आणि चांगल्या बातम्या कानावर पडतील. सगळं कसं सुरळीत चालू आहे अशी भावना मनामध्ये येईल. पैसे गुंतवणूक जपून करावी.

कर्क : प्रलंबित कामे पूर्ण होतील

राजकारण, समाजकारण जे आवडत असेल त्यामध्ये हिरीरीने भाग घ्याल. पेंडिंग राहिलेली कामे मार्गे लागतील. एकूणच दिवस चांगला जाईल असे दिसते आहे.

सिंह : समाधानकारक यश मिळेल

कामाच्या बाबतीत समाधानकारक यश मिळेल. पेंडिंग राहिलेले पत्रव्यवहार मार्गी लागतील. नवीन गोष्टी करण्याकडे कल राहील.

कन्या : व्यवहार चोख ठेवा

पैशाचे व्यवहार आज चोख ठेवा. वस्तूंची विशेषतः काळजी घ्या. देवधर्म अध्यात्माकडे मन रमवल्यास दिवस चांगला.

Rashi Bhavishya
Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

तूळ : मन आनंदी राहील

"केतकीच्या वनी आज नाचला ग मोर" अशी आपली ची अवस्था राहील. मन आनंदी राहील. आशावाद वाढेल. घेतलेले काम पूर्णत्वास जाईल.

वृश्चिक : गुप्त शत्रूंवर मात कराल

तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. गुप्त शत्रू असतील तर त्यांच्यावर मात कराल. दैनंदिन व्यवहार योग्य ठेवल्यास दिवस चांगला. विनाकारण मनस्ताप नकोच.

धनु : नातेवाईकांच्या भेटी होतील

मनोरंजन, मौजमजा आज याच्यासाठी आजचा दिवस आहे. नातेवाईकांच्या भेटी होतील. शेजारी सख्य राहील. कामाचे स्वरूप पैशाच्या दृष्टीने लाभदायक ठरेल.

मकर : प्रसिद्धी वाढण्याचा दिवस

ऑफिस मधील सहकारी यांचे सहाय्य लाभेल. नवीन गोष्टींची बेत आखणी होईल. मानसन्मान प्रसिद्धी वाढण्याचा आजचा दिवस आहे.

कुंभ : भगवंताची आराधना करा

किर्ती, सन्मान आज आपल्या बाजूने कौल देत आहेत. भगवंताची आराधना करा. नरसिंह जयंती विशेष उपासना केल्यास शुभ फल मिळेल.

मीन : व्यवहार पारदर्शक ठेवा

विनाकारण एखाद्या गोष्टीत तुम्हाला गुंतवले जाईल. म्हणूनच सर्व व्यवहार आजच्या दिवशी पारदर्शक ठेवा. काम करतो आहोत तर त्यामधून वाईट गोष्टींची प्रतिमा तयार व्हायला नको हे लक्षात ठेवा.

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com