Horoscope Today Marathi : आज तुम्हाला कणखर राहावं लागेल, अन्यथा...'; जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya Saturday: आज काही लोकांना सामाजिक क्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. आपण २० जुलैचे राशीभविष्य जाणून घेऊयात.
आजचे राशी भविष्य
Horoscope Today 20th July 2024Saam TV
Published On

आजचे पंचाग

शनिवार दिनांक - २०जुलै२०२४ आषाढ- शुक्लपक्ष तिथी-चतुर्दशी.नक्षत्र-पूर्वाषाढा.

योग-वैधृति.करण-वणिज.

रास-धनु. 

दिनविशेष- वैधृती वर्ज्य.

मेष - तापटपणावर आज नियंत्रण ठेवा. विनाकारण आपणच "आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका". कटकटी वाढण्याचा आजचा दिवस दिसतो आहे. पण भगवंताच्या सेवेमध्ये दिवस घालवल्यास हा त्रास कमी होईल.

वृषभ - आपल्या राशीला खूपदा मजेसाठी पैसे खर्च करणे आणि त्यासाठी खूप मिळवणे अशी सवय आहे. विनाकारण काळ्या पैशाच्या मागे लागून आजचा दिवस अडचणीत घालू नका. सचोटीने काम करा तरच यश मिळेल.

मिथुन- जोडीदाराबरोबर गुजगोष्टी करण्यामध्ये आजचा दिवस राहील. आनंदाच्या लहरी घेऊन येणारा दिवस आहे. कामामध्ये नवीन चांगल्या बातम्या मिळतील. ज्याचा आनंद साजरा कराल.

कर्क - आपली रासच मुळामध्ये हळवी आणि संवेदनक्षम आहे. पण या गोष्टी आयुष्यात जगताना उपयोगी पडत नाहीत. आज तुम्हाला कणखर राहावं लागेल." चोरावर मोर होऊन" राहा. तरच दिवस बरा राहील.

आजचे राशी भविष्य
Horoscope: या राशीच्या लोकांचं आज नशिब बदलणार, वाचा सविस्तर

सिंह - "कोणी निंदा व कोणी वंदा" आपलं काम आपण प्रामाणिकपणे करणे हाच आजचा संदेश आहे. उपासनेच्या मार्गातून देवाच्या जवळ जाल. कुटुंबाचे कल्याण व्हावे म्हणून व्रत करा. संपत्ती आणि संपत्ती यासाठी दिवस चांगला आहे.

कन्या - बौद्धिक राशीला बुद्धीचा खुराक हा लागतोच. काही वेळेला मनामध्ये असणाऱ्या गोष्टी घडत नाहीत. म्हणून घरामध्ये चिडचिड होईल. अनेक गोष्टी करायच्या असतात पण त्याची आखणी आज करा. थोडे दिवसांनी त्या मार्गी लागते.

तूळ - आपल्या राशीला फिरती, भ्रमंती असा दिवस आहे. आपल्या आवडीचे कामे घडतील. सर्वांच्या सहकार्याने पुढे जाल. कौतुक आणि शाब्बासकीची थाप आज मिळेल.

वृश्चिक- न बोलता काम केल्याने उगाचच आपल्याविषयी गैरसमज निर्माण होतात. सर्वांना घेऊन बरोबर चला. कोणत्याही गोष्टी, पैशाची आवक जावक असो अशा गोष्टी गुप्त ठेवू नका. त्याचे योग्य ते नियोजन करा. कुटुंबीयांना फायदा होईल.

धनु - व्यायाम,व्यापार, व्यवसाय, व्यवधान यामध्ये आजचा दिवस ग्रस्त असेल. स्वतःवर विशेष अभिमान वाटेल. दत्तगुरूंची उपासना फलदायी ठरणार आहे. इतरांचे कल्याण करा आपल्याला फायदा होईल.

आजचे राशी भविष्य
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचा जुळून आलाय लग्नाचा योग; जोडीदार मिळणार, वाचा आजचे राशीभविष्य

मकर - जितक्या गोष्टीची साठवणूक तेवढ्याच त्रास हाच नियम आहे. म्हणून अति पैसा - पैसा केलात तर आज तो विनाकारण खर्च होण्याचे योग आहेत. त्यामुळेच मनस्ताप वाढेल. त्यावर संयम ठेवा.

कुंभ - काहीतरी नवीन गोष्टी करण्याची खटपट आज आपल्याकडून होईल. त्यामध्ये यशही मिळणार आहे. आणि हे यश दुसऱ्यांबरोबर शेअर कराल. आनंदात सहभागी होण्यासाठी आपलेच लोक हवेत ना ?

मीन - आपल्या साधेपणाचा सहकारी फायदा घेतात हे लक्षात घ्या. आज थोडेसे आपल्या कामावर वेगळ्या पद्धतीने लक्ष द्या. जेणेकरून करिअरमध्ये केलेल्या कामाचे श्रेय फक्त आपल्यालाच मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रगतीचे योग.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com