Horoscope Today : आज मनाप्रमाणे घटना घडतील, पैशांची आवक राहील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today : आज काही राशींच्या लोकांच्या मनाप्रमाणे घटना घडतील, पैशांची आवक राहील.
Horoscope
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

आजचे पंचांग

शनिवार,२६ ऑक्टोबर २०२४, अश्विन कृष्णपक्ष.

तिथी-दशमी २९|२४

रास-कर्क ०९|४६ नं. सिंह

नक्षत्र-आश्लेषा

योग- शुक्लयोग

करण- वणिज

दिनविशेष-वृद्धितिथी

मेष - आई विषयी विशेष प्रेम आणि ओढ वाटेल. घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये आज व्यस्त राहण्याचा दिवस आहे. खरेतर आपल्या राशीला या गोष्टी बऱ्याचदा आवडतात. पण घरातील कामाचा लोड सुध्दा आज जाणवेल.

वृषभ - वाचन, लेखन, मनन, चिंतन यामध्ये आज विशेष रुची वाढेल. ठरवलेल्या गोष्टी त्याचप्रमाणे होतील. प्रिंटिंग क्षेत्र, प्रकाशन क्षेत्रात विशेष प्रगतीचे आज योग आहेत.

मिथुन- आजचा दिवस अगदी सहज दिसतो आहे. मनाप्रमाणे घटना घडतील. पैशांची आवक जावक चांगली राहील. इतरांशी गोड बोलून आपला कार्यभाग साधाल.

कर्क - प्रेमाने जग जिंकता येते. हे पुन्हा आज जाणवेल. आपल्या मायाळू आणि प्रेमळ स्वभावामुळे आपल्या आजूबाजूची लोक आनंदी राहतील. खूप मोठ्या महत्त्वाकांक्षा न ठेवता दिवसात मनासारख्या गोष्टी घडून येतील.

सिंह - मोठ्या इच्छा आणि अपेक्षा ठेवणे काही चुकीचे नाही. आज अशाच गोष्टींसाठी विशेष बैठका होतील. परदेशात जाण्याचे योग निमित्त काही निर्णय आज तुमच्याकडून होतील. मात्र आज पैसा जास्त खर्च होईल .

Horoscope
Chanakya Niti: व्यक्तीला पूर्णपणे उद्धवस्त करतात आयुष्यातील 'या' घटना

कन्या- नातेवाईकांशी तुमचे योग्य पद्धतीने आचरण राहील. त्यांच्याकडून तुम्हाला सुद्धा एक वेगळ्या पण प्रकारचा आदर मिळेल. दिवस चांगला जाईल.

तूळ - न्यायाची देवता असेच आपल्या राशीचे चिन्ह आहे. आज काही गोष्टी आपल्या कर्माप्रमाणे आपल्या पदरात पडतील. चुकीच्या गोष्टी करू नका. समाजसेवेमधून प्रगती साधाल.

वृश्चिक- विशेष शिवपार्वतीची उपासना आज फलदायी ठरेल. नेटाने आणि धडाडीने कामे कराल.अर्थातच भाग्यची योग्य साथ मिळाल्यामुळे गोष्टी मनासारख्या घडताना दिसतील.

धनु - "ऐलतिर का पैलतीर" अशा संदिग्धते मध्ये आजचा दिवस राहील. कामे तर करायची आहेत पण त्यामध्ये अडचणी निर्माण होतील. म्हणून निर्णय घेताना संभ्रम होईल. आजची कामे उद्यावर ढकललेली जास्त बरे राहील.

मकर - जोडीदाराचा व्यवहार आज आपल्याशी चांगला राहील. संसाराची नवीन स्वप्न घेऊन आलेला आजचा दिवस आहे. सर्व काही अलबेल आहे अशी भावना होईल. व्यवसाय वृद्धी दिसते आहे.

Horoscope
Chanakya Niti: वयाच्या २० वर्षांनंतर 'या' चुका करूच नका; नाहीतर वाईट काळ सुरु झाला असं समजा

कुंभ - जीवन हे सातत्याने बदल घडवीत असते. असे काही बदल आज आपल्याला स्वीकारावे लागतील. जुन्या गोष्टी ज्याच्यातून त्रास होतोय त्यापासून अलिप्त रहा. शत्रूवर्ग यांचा उपद्रव वाढेल.

मीन - संतती आपल्याकडे नवीन काहीतरी सुवार्ता घेऊन येईल. शेअर्समध्ये फायदा संभवतो आहे. कलाक्षेत्र, मनोरंजन क्षेत्रामध्ये आज व्यस्त रहाल. दत्त उपासना करावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com