

पंचांग
गुरुवाार, २५ डिसेंबर २०२५,पौष शुक्लपक्ष,
ख्रिसमस.
तिथी-पंचमी १३|४३
रास-कुंभ
नक्षत्र-धनिष्ठा
योग-वर्ज्य
करण-बालव
दिनविशेष-उत्तम दिवस
मेष - आज सुट्टीचा दिवस जवळच्या स्नेही जनांबरोबर आनंदात घालवाल. आपले नातेवाईक सून, जावई, प्रियकर यांबरोबर मजा करण्याचा दिवस आहे.कदाचित काही लाभ झाल्यामुळे हा आनंद तुम्ही आज साजरा कराल.
वृषभ - जितक्या ज्या गोष्टी सहज सोप्या आहेत त्या आज होतील .धावपळ असेल तर यश मिळेल. कलाक्षेत्रातल्या मनोरंजन क्षेत्रातल्या लोकांना विशेष प्रगतीचे दिवस आहेत. करिअरला नवीन वाटा मिळतील. दिवस चांगला आहे.
मिथुन - विष्णू उपासनेने मनोरथ पूर्ण होतील. खरे तर आपण काहीच करत नसतो एक वेगळी दैवी शक्ती आपल्याला अनेक गोष्टी सहज प्रदान करत असते हे जाणवेल. दानधर्म, उदारता, अध्यात्मिक बैठक यामध्ये दिवस व्यस्त राहील.
कर्क - कोण होतास तू काय झालास तू अशा काही विचार मनात येतील . कदाचित नकारात्मक विचारांचे जाळे तयार होईल. एकट्याला काम पेलवणार नाही पण कोणाच्या सहकार्याची आज अपेक्षाच नको. मोठे धनलाभ मात्र होतील.
सिंह - प्रत्येक व्यक्तीमध्ये अधिक वजा काही गुण असतात हे सांभाळून घेऊन समजून पुढे जाणे म्हणजेच संसार हे आज लक्षात घ्या. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नकारात्मक गुण सोडून देऊन आज काम केल्यास दिवस चांगला राहील. कोर्टाची कामे ,व्यवसाय, संसारिक सर्व ठिकाणात चांगली बाजी माराल .
कन्या - खूपदा आपण काही न करता तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतात. आज तुम्हाला पोटाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. बाहेरचे खाणे टाळा. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा. कनिष्ठ व्यक्तींपासून सावध रहा. आपले महत्त्वाचे ऐवज यांना संभाळा.
तूळ - लक्ष्मी आपल्या घरी यायचं म्हणते आहे. याकडे या सुसंधीचे आनंदाने स्वागत करा. लॉटरी, शेअर्स, कला, क्रीडा नव्या काही गोष्टीच्या उलाढाल यातून पैसा मिळेल संतती सौख्य उत्तम आहे.
वृश्चिक - जमिनीवरचे बैठे घर व्हावे अशी आपल्याला इच्छा असेल तर आज या दृष्टीने काही व्यवहार होतील. प्रेम केले असेल तर आपल्या जोडीदारासाठी खर्च करण्याचे आज योग आहेत. घरामध्ये सुद्धा नव्याने काहीतरी खरेदी होईल .
धनु - व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. काही नवीन बैठका आज घडतील. जवळचे प्रवास होतील. लेखणी, वक्तृत्व यामध्ये विशेष यश आहे. लेखक प्रकाशकांना दिवस चांगला आहे.
मकर - काय करावे असे थोडी संदिग्धता असेल. जुन्या पैशांची निगडित व्यवहाराचे काही निर्णय होतील. कुटुंबातील मोठे व्यक्तीच्या जबाबदाऱ्या पार पाडावे लागतील. अर्थात त्यांचा सल्ला आणि आशीर्वादाने दिवस चांगला जाईल .
कुंभ - काहीतरी नव्याने शोध आपल्या राशीला सतत आवडतो. आज स्वमग्न राहून या सर्व गोष्टींचा विचार कराल. कामालाही चांगले चलन असेल. आनंद घेऊन आलेला दिवस आहे. मात्र सर्व गोष्टींमधून नकारात्मक विचार काढून टाका.
मीन - खरे तर आयुष्यात आपण काहीच करत नसतो. आज काही गोष्टी चुकीच्या झाल्या तरी त्याचे खापर आपल्यावर घेऊ नका. परिस्थितीशी दोन हात करावे लागतील. नाहक पैसा, बंधन महत्त्वाचे जिन्नस या सर्व गोष्टीबाबत सतर्क रहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.