Thursday Horoscope : सोनं, पैशांचं घबाड हाती लागणार; ५ राशींचे लोक डाव साधणार

Thursday Horoscope in Marathi : काही राशींच्या सोनं, पैशांचं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. काहींचा दिवस चांगला जाईल.
Horoscope in Marathi
Horoscope Saam tv
Published On

पंचांग

गुरुवार,११ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष,कालष्टमी.

तिथी-सप्तमी १३|५८

रास-सिंह

नक्षत्र-पूर्वा

योग-विष्कंभ

करण-बवकरण

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - आपल्याला या जन्मात मिळालेले सुख दुःख आपल्या मागच्या जन्मातील चांगल्या वाईट गोष्टींमुळे असते हे आज जाणवेल. विशेष ओढा उपासनेकडे त्यामुळेच वाढेल. मनस्वास्थ्य चांगले राहील. दिवस चांगला आहे. धनयोग उत्तम आहेत.

वृषभ - कलाकारांना दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. व्यवसायामध्ये नवा काहीतरी बदल होईल. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे यामध्ये सकारात्मकता सुद्धा येईल. दिवस सौख्यकारक आहे.

मिथुन - वैवाहिक जीवनातून भाग्य फुलेल. जोडीदाराकडून छानसा काहीतरी फायदा होण्याची दाट शक्यता आहे. भावंड सौख्य चांगले राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Horoscope in Marathi
Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वीच निघेल 'दिवाळं', चुकूनही घराला देऊ नका हे रंग, वास्तुदोषाचा करावा लागेल सामना

कर्क - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. न ठरवता काही गोष्टी होतील. अडचणीच्या काळात आपलेच मदत करतात हे समजेल. कुटुंबामध्ये स्नेहबंध जोपासले जातील.

सिंह - मोडेन पण वाकणार नाही अशी आपली रास आहे. आज स्वतःचे अस्तित्व सकारात्मक जाणवेल. नवनवीन संकल्पना योजना यांनी भारलेला दिवस असेल. आरोग्य उत्तम राहील. शिस्तबद्ध पद्धतीने दिवसाचा शेवट होईल.

कन्या - परदेशातून फायदा दिसतो आहे. कदाचित मित्र-मैत्रिणी सुद्धा असू शकतील. काही गोष्टींमध्ये खर्च केल्याशिवाय चार चांगल्या गोष्टी मिळत नाहीत. आज मोठे खर्च होतील. प्रेमामध्ये मात्र अपयश मिळेल.

Horoscope in Marathi
Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

तूळ - कामाच्या ठिकाणाहून केलेल्या गोष्टीचा योग्य परतावा धनाचे स्वरूपात मिळेल. व्यवसायामध्ये नवनवीन कल्पनांनी भरलेला आजचा दिवस आहे. मित्र-मैत्रिणींचे सुख चांगले असेल.

वृश्चिक - "लाथ मारेल तिथे पाणी काढेल" अशी आपली रास आहे. कुठेही न घाबरता आज जरी नवीन क्षेत्र असेल तरी प्रवेश कराल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल दिवस चांगला आहे.

धनु - दत्तगुरूंची कृपा राहील. मनामध्ये सकारात्मक भाव असतील. मोठ्या प्रवासांना दिवस चांगला आहे. आपले दानधर्म वाढेल. उदारता मुळे इतर लोकांना तुम्ही आपलेसेही कराल. दिवस चांगला आहे.

Horoscope in Marathi
Vastu Tips : श्रीमंतांच्या घरी 'या' वस्तूंनी होते भरभराट; जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

मकर - भ्रष्टाचार लाचलुचपत, नको तो पैसा, हुंडा, जोडीदाराकडून मिळणारा पैसा काळा पैसा यामध्ये गुंतलेला आजचा दिवस आहे. सावध आणि सजग राहून कामे करावीत. अन्यथा "आ बैल मुझे मार" अशी अवस्था होईल.

कुंभ - चोख कामे आज होतील. एकूणच यश घेऊन आलेला आजचा दिवस आहे. भागीदारी व्यवसाय सुरू करणार असाल तर हरकत नाही. सहकाऱ्यांच्याकडून उत्तम साथ मिळाल्यामुळे व्यापाराचा आलेख उंचावेल.

मीन - आजोळी प्रेम वाढेल. जवळच्या लोकांकडून घात झाल्यासारख्या मात्र गोष्टी होतील. सजग पणे कार्य करायला लागेल. नोकर चाकारांपासून महत्त्वाच्या गोष्टी सांभाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com