Thursday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडणार,हित शत्रूंवर मात कराल; ५ राशींच्या लोकांची यशाची कमान वाढती राहणार

Thursday Horoscope in marathi : आज काही राशींचे लोक हित शत्रूंवर मात करतील. तर काहींच्या मनासारख्या गोष्टी घडतील. वाचा गुरुवारचं राशीभविष्य
Horoscope in Marathi
Horoscopesaam tv
Published On

आजचे पंचांग

गुरुवार,१७ जुलै २०२५,आषाढ कृष्णपक्ष,कालाष्टमी,करिदिन.

तिथी-सप्तमी १९|१०

रास-मीन २७|३९ नं. मेष

नक्षत्र-रेवती

योग-अतिगंड

करण-विष्टीकरण ०८|०८

बवकरण १९|१०

दिनविशेष-करिदिन

Horoscope in Marathi
Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

मेष - वाहनांपासून आज काळजी घ्यावी लागेल. जपून व्यवहारही करावे लागतील. विनाकारण तापटपणा वाढवून अंगावर संकटे ओढवून घ्याल. हे लक्षात ठेवा.

वृषभ - आपले कोण आणि परके कोण याची आज विशेष जाणीव होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल. ठरवलेल्या गोष्टी तशाच होतील. मनोरंजनाकडे विशेष कल राहील. अनेक लाभ होतील.

मिथुन - गुंतवणुकीचे प्रस्ताव, वाहनांशी निगडित क्रयविक्रय प्रॉपर्टीचे व्यवहार अशा गोष्टी आज सामोर येतील. तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात चांगली घोडदौड राहील.

कर्क - दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक क्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल. शिव उपासना विशेष फलदायी ठरेल. तीर्थक्षेत्री भेट देण्याचेही योग येतील.

सिंह - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एकटेपणाची भावना होईल. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. शक्यतो पुढे ढकललेले बरे.

कन्या - मानसिक स्वास्थ आणि समाधान मिळेल. तुमच्या सल्ल्याने इतर लोक पुढे जातील. त्यांच्यावर तुमचा विशेष प्रभाव राहील. व्यवसायात प्रगतीपथावर राहाल.

Horoscope in Marathi
Vastu Shastra: घरात कोणत्या रंगाचे शिवलिंग ठेवणे शुभ? वाचा आध्यात्मिक कारण

तूळ - वेळ आणि पैसा वाया जाईल असे वाटते आहे. उगाच मोठ्या उड्या आज नकोतच. हित शत्रूंवर मात करून पुढे जाल. तब्येत मात्र सांभाळा.

वृश्चिक - मन आनंदी आणि आशावादी राहणार आहे. नव्या नव्या गोष्टी मनामध्ये येतील. बुद्धी त्या पद्धतीने कामही करेल. संतती बरोबर खेळीमेळीच्या वातावरणामुळे आज मन भरून पावेल.

धनु - एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येईल. नोकरी व्यवसाय यामध्ये समाधानकारक स्थिती राहणार आहे. मातृसौख्य उत्तम असेल.

Horoscope in Marathi
Vastu Shastra: पिंपळाचे झाड तोडले का जात नाही? जाणून घ्या त्याचं महत्त्व

मकर - व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. भावंडे बहिणी भाऊ यांबरोबर महत्त्वाच्या गोष्टींवर निर्णय होतील. यांच्या पाठिंबामुळे पुढे जाल.

कुंभ - घरी पाहुण्यांची ऊठबस होईल. मनासारख्या गोष्टी घडणार आहेत. असा आजचा दिवस आहे. मनासारखे धनयोग आहेत. स्वास्थ आणि समाधान दोन्हीमुळे मिळाल्यामुळे दिवस सुखकर जाईल.

मीन - जे काम हाती घ्याल त्यामध्ये आज यश मिळेल. यशाची कमान वाढती राहील. इतरांनी केलेले कौतुक यामुळे इंचभर छाती वाढेल. आत्मविश्वासाने पुढे जाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com