Budhaditya Rajyog: 17 सप्टेंबरपासून या राशींचं नशीब पालटणार; सूर्य आणि बुधाची युती करणार मालामाल

Budhaditya Rajyog In Kanya: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला खूप महत्त्व दिले जाते. जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात, तेव्हा त्यांचा विशेष प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. सप्टेंबर महिन्यात असाच एक महत्त्वाचा योग तयार होणार आहे.
Budhaditya Rajyog
Budhaditya Rajyogsaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह ठरावीक काळानंतर राशी बदलत असतात. सूर्यदेव साधारणपणे ३० दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे पुन्हा त्याच राशीत पुन्हा येण्यास सूर्याला पूर्ण एक वर्ष लागते. या प्रवासात सूर्याची इतर ग्रहांसोबत युती होत राहते. लवकरच सूर्याची युती बुधासोबत होणार आहे आणि त्यामुळे बुधादित्य योग तयार होईल. हा शुभ योग काही राशींवर खूप चांगला परिणाम घडवू शकतो.

सूर्य-बुधाची युती कधी होणार?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १ वाजून ३८ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधदेव मात्र त्याआधीच १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सूर्य-बुधाची युती कन्या राशीत घडेल. या युतीमुळे आणि राजयोगामुळे कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो ते पाहूयात.

Budhaditya Rajyog
Horoscope: होळीपासून 'या' राशींचे येणार अच्छे दिन; गजकेसरी राजयोगामुळे लागणार जॅकपॉट, वाढेल हुदा अन् पैसा

मिथुन राशी

मिथुन राशीत चौथ्या भावात हा बुधादित्य योग तयार होणार आहे. या योगामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत यश मिळणार आहे. कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळू शकणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात चांगले परिणाम दिसून येतील. कामानिमित्त परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदाराचा विश्वास जिंकता येईल.

कन्या राशी

या राशीतच सूर्य-बुधाची युती होत असल्याने कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप लाभदायक ठरणार आहे. या योगामुळे आयुष्यात आनंद आणि प्रगती येणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. प्रेमसंबंध चांगले राहतील आणि जोडीदारासोबत प्रवासाची संधी मिळू शकणार आहे. नवी नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळणार आहे.

Budhaditya Rajyog
Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीत हा योग अकराव्या भावात होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचा समाजात मान वाढणार आहे. मित्रांसोबत छान वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. एकत्र कुठे तरी प्रवास करून आनंदी क्षण साठवता येणार आहे. आयुष्यात आनंदाची चाहूल लागणार आहे. तुमच्या बोलण्यात प्रभाव राहील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

Budhaditya Rajyog
Mahalaxmi Rajyog 2025: हरतालिकेनंतर 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; महालक्ष्मी राजयोगामुळे मिळणार धन-संपत्ती

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com