Sunday Horoscope : खर्चाचे प्रमाण वाढणार, महत्वाची कामे रखडणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, अन्यथा...

Sunday Horoscope in marathi : काही राशींच्या लोकांचे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. तर काहींचे महत्वाचे कामे रखडण्याची शक्यता आहे. रविवारचं राशीभविष्य एका क्लिकवर
Horoscope Today
Daily Horoscope Today Marathi Saam TV
Published On

आजचे पंचांग

रविवार,२९ जून २०२५,आषाढ शुक्लपक्ष.

तिथी- चतुर्थी ०९|१५

रास- कर्क ०६|३४ नं. सिंह

नक्षत्र-आश्लेषा

योग-वज्र

करण-विष्टीकरण

दिनविशेष-९ नं. चांगला

मेष - तुम्ही घेतलेल्या निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरणार आहेत. प्रवासाला जाणारा असाल तर प्रवास सुखकर होतील. संबंधित लोकांचा आपल्यावर विश्वास राहील.

वृषभ - हाती घेतलेले काम नेटाने पुढे न्याल. त्याच्यामध्ये सुयश नक्कीच मिळणार आहे. नातेवाईकांच्या सहकार्याने कामाच्या गोष्टी आज साध्य करून घ्याल.

मिथुन - काहींना अचानक धनलाभ ची शक्यता आहे. व्यवसाय वृद्धी दिसते आहे. पण जोडीदाराच्या तब्येतीची सुद्धा आज काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक स्वास्थ चांगले आहे.

कर्क - तुमचे कार्यक्षेत्र वाढते राहणार आहे. मनोबल उत्तम राहील. मनासारख्या घटना घडल्यामुळे आरोग्य सुद्धा चांगले राहील.

सिंह - आपल्या वस्तू, ऐवज त्यांची काळजी घ्या. महत्त्वाच्या गोष्टी शक्यतो आज नकोतच. रखडण्याची शक्यता किंवा त्याच्यामध्ये अडथळे येतील.

कन्या - संतती हा कधीकधी आपल्यासाठी चिंतेचा विषय असतो. आपला बौद्धिक दर्जा चांगला आहे. असे संततीने वेगळे काही करावे असे वाटते. आज त्यांचे प्रश्न मार्गी लागतील.प्रियजनांचा सहवास लाभेल.

Horoscope Today
Vastu Tips: स्वप्नात कमळाचे फूल दिसणे 'हे' कोणत्या गोष्टीचे संकेत आहे?

तुळ - तुम्ही जे क्षेत्र निवडलेले आहे त्याच्यावर मनापासून प्रेम करता. या क्षेत्रात तुम्हाला मानसन्मान प्रतिष्ठा आज लाभण्याचा दिवस आहे. वरिष्ठ लोकांच्याकडून सहकार्य मिळेल. बढतीचे योग आहेत.

वृश्चिक - तुमच्या कर्तुत्वाला नवनव्या संधी प्राप्त होतील. आरोग्य उत्तम राहील. नेटाने काम केल्यामुळे यशाची कमान चढती राहील.

धनु - खर्चाचे प्रमाण वाढते राहील. उगाचच मानसिक चिंता अस्वस्थता जाणवेल. गोंधळी मनस्थिती मध्ये काम करणे हे त्रासदायक असतं हे ओळखून मनोबल उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करा.

Horoscope Today
Vastu Tips: चुकून झाडूवर पाय ठेवल्यास काय करावे?

मकर - भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभणार आहे. मन आनंदी आणि आशावादी राहील. जोडीदाराकडून सुद्धा योग्य सहकार्य आज मिळेल.

कुंभ - दैनंदिन कामांमध्ये बाधा येण्याची शक्यता आहे. विनाकारण उकरून काही गोष्टी आज काढू नका. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. ठरवेल तसेच होईल असा दिवस नाही.

मीन - गुरुची कृपा असणार आहे.आपली विशेषता बौद्धिक क्षेत्रात आज प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण सुद्धा समाधानकारक राहील. नव्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायला हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com