Sunday Horoscope : धनलाभ होणार, हातात पैसा खेळता राहणार; 5 राशींच्या लोकांना बंपर लॉटरी लागणार

Sunday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या हातात पैसा खेळता राहणार आहे. तर काहींना बंपर लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
Saturday Horoscope in Marathi
Horoscope In MarathiSaam tv
Published On

पंचांग

रविवार,२३ नोव्हेंबर २०२५, मार्गशीर्ष शुक्लपक्ष.

तिथी-तृतीया १९|२५

रास- धनु

नक्षत्र-मूळ

योग-धृतियोग

करण-गरज

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - आजचा दिवस सुदिनच म्हणावा लागेल. मनात ठरवले काय याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी आज घडतील. चांगल्या वार्ता कानी येतील. काहीतरी महत्त्वाचे निर्णय आज तुमचे मार्गी लागणार आहेत. गणेश उपासना करावी.

वृषभ - जोडीदाराकडून धनालाभाची शक्यता आहे. सरकारी कामांमध्ये मात्र व्यत्यय दिसतो आहे. चुकीच्या गोष्टी करण्याच्या मागे लागू नका. अधिक पैशाची हाव आज बरी नव्हे हे लक्षात ठेवा.

मिथुन - बौद्धिक असणारी आपली रास. कोर्टाच्या कामात सहज बाजी माराल. आलेल्या अडचणींवर मात करून पुढे जाणार आहात.यामध्ये आपल्या जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

Saturday Horoscope in Marathi
Tulsi Plant Vastu Tips: घरात पैसा टिकणार नाही, लक्ष्मीही होईल नाराज; चुकूनही तुळशीजवळ ठेवू नका या गोष्टी

कर्क - हाताखाली लोकांपासून सावध राहण्याचा आज इशारा आहे. महत्त्वाचे ऐवज जिन्नस संभाळा विनाकारण डोकेदुखी वाढेल. कोणाच्या अति आहारी गेल्यास मनस्वास्थ बिघडणार आहे.

सिंह - रवी उपासना करावी. शेअर्स आणि लॉटरी मध्ये यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागणार आहेत. प्रेमामध्ये महत्त्वाचा टप्पा आज पार कराल. मात्र आपला आब राखून कामे करावेत.

कन्या - नव्याने खरेदी विशेषतः पुस्तक खरेदी जवळच्या लोकांबरोबर बौद्धिक चर्चा होतील. मात्र सुखाला दिवस चांगला आहे. आपली द्विधावस्था मात्र टाळणे आज गरजेचे आहे.

Saturday Horoscope in Marathi
Lakshmi Photo Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात आणि ऑफिसमध्ये माता लक्ष्मीचा फोटो कुठे आणि कसा लावावा?

तूळ - भावंडांचे सौख्य मिळेल. एखादा मोलाचा सल्ला त्यांच्याकडून सहज मिळेल. त्या मार्गावर गेल्यास आपला पराक्रम वाढीस लागेल. जवळचे प्रवास होतील. शेजारी आपल्या मताशी सहमत असतील. दिवस चांगला आहे.

वृश्चिक- धनकारक असा दिवस आहे. पण जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.वारसा हक्काशी निगडित काही प्रश्न रेंगाळलेले असतील तर आज ते सुरळीत मार्गी लागतील.

धनु - आज आपल्या लहरीपणावर मात करून पुढे जाल. स्वतःसाठी जगण्याचा निर्धार करून कामे करा. आपला प्रभाव इतरांवर आहे. दिवस व्यस्त आणि धावपळीचा असेल.

Saturday Horoscope in Marathi
Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

मकर - पैसे जपून वापरणे आज गरजेचे आहे. अनेक गोष्टींचा गैरवापर होईल. मग ती आपली मानसिकता सुद्धा असू शकेल.यासाठी आपली अवस्था कधी कधी चीधरण उशाशी, ओरड घशाची" अशी होते हे टाळणे गरजेचे आहे.

कुंभ - मैत्रीचे बंध घट्ट होतील. काहीतरी संशोधनात्मक कार्यात एकत्रित रित्या मिळून सहभाग घ्याल. परदेशी वार्तालाप होतील. कमोडिटी मार्केटमध्ये आज नशीब आजमावयला हरकत नाही.

मीन - प्रेमाने जग जिंकता येते हे आज नव्याने जाणवेल. कामाच्या ठिकाणी आपण आज पर्यंत केलेल्याची पावती मिळेल. आपल्या लोकांच्याकडून स्नेहाला स्नेह असे भावना जोडत नवीन साखळी तयार कराल. दिवस चांगला आहे.सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com