Sunday Horoscope : भाग्याला कलाटणी मिळणार, जुन्या गोष्टींमधून फायदा होणार; रविवार ५ राशींच्या लोकांसाठी गेमचेंजर ठरणार

Sunday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांच्या भाग्याला कलाटणी मिळणार आहे. तर काहींसाठी आजचा दिवस गेमचेंजर ठरणार आहे.
Horoscope in marathi
HoroscopeSaam tv
Published On

आजचे पंचांग

रविवार,२० जुलै २०२५,आषाढ कृष्णपक्ष.

तिथी-दशमी १२|१४

रास-वृषभ

नक्षत्र-कृत्तिका

योग-गंड

करण-विष्टीकरण

दिनविशेष-कृत्तिका वर्ज्य

मेष - पैशाला पैसा जोडणं आज महत्त्वाचे आहे. काही वेळेला अशी साखळी पुढील भवितव्यासाठी महत्त्वाची ठरते.धनाची आवक समाधानकारक राहील. त्यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा करावे लागतील.दिवस धावपळीचा असेल.

वृषभ - रसिकता जपून अनेक कामे कराल. ठरलेल्या गोष्टी वेळेत झाल्यामुळे मनाला स्वास्थ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. दिवस मनस्वी आहे .

मिथुन - काय करावे आणि काय करू नये अशा काहीशा संभ्रमात असाल. महत्वाचे निर्णय घेताना तारेवरची कसरत होईल. कदाचित ते लांबणीवर सुद्धा पडतील. जवळच्या व्यक्तीचा यासाठी सल्ला घ्या.

Horoscope in marathi
Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

कर्क - एखादी नवीन भाषा अवगत करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रगतीच्या दृष्टीने द्वारे खुली होतील. जुन्या गोष्टींमधून नवा फायदा आज मिळणार आहे. दिवस चांगला आहे.

सिंह - जे ठरवाल ते होईलच असा आजचा दिवस उदयाला आलेला आहे. आपल्या वरिष्ठ लोकांची विशेष मर्जी आपल्यावर आहे. ठरवलेल्या गोष्टी योग्य प्रकारे घडतील. कामाला भरती येईल.

कन्या - भाग्याला कलाटणी मिळणारा आजचा दिवस आहे. देवाने भरभरून दान आपल्याला दिले आहे. आपल्या क्षमतेची चाचणी घेऊनच आज पुढे जाल. कृतज्ञता व्यक्त करायला लावणारा आजचा दिवस आहे. विष्णू उपासना करावी.

Horoscope in marathi
Vastu Shanti Puja: घरात वास्तुशांती पूजा करताना या गोष्टी टाळाच, नाहीतर होईल नुकसान

तूळ- अचानक धनलाभाची आज शक्यता आहे. प्रयत्नांना यश मिळेल. पण खडतर प्रयत्न करावे लागतील. एकाहाती सत्ता घेतलेले आज बरे राहील.

वृश्चिक - जोडीदाराबरोबर हितगुज साधावे. प्रेमाला उधाण येईल. एकमेकांसाठी सहकार्य केल्यामुळे नाते वृद्धिंगत होईल. महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय आज घेतले तर बरे राहील. दिवस संमिश्र आहे.

धनू - पोटाविषयी, उष्णतेचे, मुळव्याधविषयी, मानसिक आजार आज त्रस्त करतील. जवळच्या लोकांकडून वाईट वर्तवणूक मिळाल्यामुळे मनस्वास्थ्य खराब राहील. धीराने आजच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.

Horoscope in marathi
Vastu Shastra: पिंपळाचे झाड तोडले का जात नाही? जाणून घ्या त्याचं महत्त्व

मकर - शिवकृपाशीर्वाद विशेष आपल्यावर राहणार आहेत. संततीकडून मनासारख्या घटना घडतील. तुमच्यासाठी प्रेरणादायी दिवस आहे. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीपथ आहे.

कुंभ - देवा विषयी आपल्या भावना विशेष सकारात्मक भाव नाहीत. पण आज काही गोष्टी अशा होतील आपल्याला धार्मिक कार्यात घरगुती कार्यक्रमात सहभाग घ्यावा लागेल. पण एकूणच मनशांती चांगली लाभेल.

मीन - बहिण - भावाचे कामाविषयी विशेष सहकार्य मिळेल. पराक्रमामध्ये भर पडेल. जवळचे प्रवास होतील. पत्रव्यवहार मार्गी लागतील. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com