Saturday Horoscope : दहीहंडीचा उत्सव या राशींच्या लोकांसाठी खास ठरणार, वाचा शनिवारचं राशीभविष्य

Saturday Horoscope Update : काही राशींच्या लोकांसाठी गोपालकाला सण खास ठरणार आहे. तर काहींना धनलाभ होणार आहे.
horoscope in marathi
horoscope Saam tv
Published On

आजचे पंचांग

शनिवारी,१६ ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष,कालाष्टमी,गोपाळकाला,

मघा रवि सिंह २५;५२

तिथी-अष्टमी २१|३५

रास-मेष ११|४४ नं. वृषभ

नक्षत्र-कृत्तिका

योग-वृद्धि ०७|२१

ध्रुव २८|२८

करण- बालव

दिनविशेष-कृत्तिका वर्ज्य

मेष - आज गोपाळकाल्याचा दिवस, वेगळाच आनंद उत्सव आपण साजरा करणार आहात. उत्साहाने सर्व कार्यात सहभाग घ्याल. वेगळे काहीतरी धाडस आणि साहस करण्याचा पण आज कराल.

वृषभ - धरसोड वृत्तीने कोणत्याही गोष्टी आज करू नका. नियोजनबद्ध कामांमध्ये नक्की यश मिळेल. कदाचित बंधन योग किंवा ठरलेल्या कामात अडचणी येतील अशी संभवता आहे.

मिथुन- प्रेमामध्ये विनाकारण कटकटी निर्माण होतील. ठरवून केलेल्या गोष्टींमध्ये विघ्न येण्याची शक्यता आहे. पण गुंतवणुकीच्या दृष्टीने लाभ होतील. कोणती तरी सकारात्मकता घेऊन पुढे जाल.

कर्क - प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी आपला उत्कर्ष आज नक्की दिसतो आहे. केलेल्या कामाचे चीज होईल. मनस्वी आनंद वाटेल. समाजकारणात यश आहे.

सिंह - रवी उपासना करावी तीर्थक्षेत्रि भेटी होतील. कुठल्यातरी मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे सहज पुढील कामांच्या बैठका आणि निर्णय होतील. सुवर्ता कानी येतील. दिवस चांगला आहे.

कन्या - निर्णय घेताना मन कचरेल. कदाचित योग्य निर्णय आपल्याकडून आज होणार नाहीत. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या सल्ल्याने पुढे गेल्यास कामे वर्णी लागतील. काही वेळेला स्वतःला महत्त्व देणे गरजेचे आहे हेही आज समजेल.

horoscope in marathi
Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

तुळ - जोडीदाराच्या इच्छा आणि आकांक्षा आज जपाव्या लागतील. कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. स्वतःला महत्त्व देण्यापेक्षा भागीदार आणि जोडीदाराचे सल्ले मान्य कराल तर प्रगती होईल.

वृश्चिक - नको असलेल्या कटकटी मागे लागतील. तब्येत जपावी लागेल. काही गोष्टींचा अंदाज न आल्यामुळे निर्णय चुकतील. स्वभावाने मोकळे होऊन आज काम करणे गरजेचे आहे. आजोळी मदत होईल.

धनु - दत्तगुरूंची उपासना आज फलदायी ठरेल. श्रीकृष्ण भक्ती प्रसाददायी ठरेल. शेअर्समधील गुंतवणुकी मधून फायदा संभवतो आहे. विद्यार्थी वर्गासाठी दिवस उत्तम आहे. नवनवीन गोष्टीत सहभाग घ्याल.

horoscope in marathi
Vastu Tips: भाद्रपद महिन्यात तुळशीला अर्पण करा 'ही' खास वस्तू, होतील आर्थिक लाभ

मकर - जुन्या घराचे, वाहन खरेदीचे आज योग आहेत. घरातील मोठ्या व्यक्तीची सेवा करावी लागेल. शांत राहून अवलोकन केल्यास चांगल्या वाईट गोष्टी मधील फरक कळेल. निर्णय चुकणार नाही त्याची काळजी.

कुंभ - भावंड सौख्य उत्तम आहे. कानाशी निगडित आजार आज जपावे लागतील. ज्येष्ठांच्या सहकार्याने पुढे जाल. वेगळे काहीतरी धाडस करण्याचा आज मानस असेल. दिवस चांगला आहे.

मीन - आर्थिक दृष्टीने दिवस धनदायी आहे. धानाची आवक चांगली राहील. पैसे वाचवण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न कराल. घरातील व्यक्तींचा मोलाचा सल्ला आज घ्याल. स्वस्थ राहाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com