Horoscope Today : घरात पाहुण्यांची ऊठबस राहील, तर काहींनी ठेवा तापट विचारांवर अंकुश; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today in Marathi : काही राशींच्या लोकांच्या घरात पाहुण्यांची ऊठबस राहील. तर काहींना तापट विचारांवर अंकुश ठेवावा लागेल. वाचा तुमचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

आजचा पंचांग

रविवार,१५ डिसेंबर २०२४,मार्गशीर्ष शुक्लपक्ष,पौर्णिमा

तिथी- पौर्णिमा १४|३२

रास- वृषभ १५|०४ नं. मिथुन

नक्षत्र- मृग

योग- शुभयोग

करण- बवकरण

दिनविशेष- चांगला दिवस

मेष - गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पैशाची आवक जावक चांगली राहील. मसालेदार, तिखट पदार्थ खावे अशी इच्छा होईल. कुटुंबीयांबरोबर छोटे-छोटे आनंद साजरे कराल.

वृषभ - मनासारखे आयुष्य जगावेसे वाटेल. आपली कलंदर असणारी रास आज सकारात्मक पावले उचलेल. इतरांना तुमच्यामुळे ऊर्जा मिळेल.

मिथुन- विनाकारण कटकटी आणि त्रास मागे लागतील. पण देवाची आस आणि अध्यात्माचा ध्यास तुम्हाला यातून बाहेर काढेल. आपल्या तापट विचारांवर अंकुश ठेवा.

Horoscope Today
Vastu Tips Of Tulsi Plant: तुळशीच्या भांड्यात ठेवा ही एक गोष्ट; पैशांची चणचण भासणार नाही

कर्क- मित्रांचे प्रेमामुळे आकाशात ठेंगणे वाटेल. एखाद्या आपण केलेल्या चांगल्या गोष्टीची शाबासकीची थाप त्यांच्याकडून मिळेल. एकत्रितरित्या या सुकर्माचा आनंद लुटाल.

सिंह - राजकारणामध्ये यश आहे. काही वेळेला आपण इतरांवर केलेले उपकार आपले उदारता याची चांगली फलित मिळताना आपल्याला दिसतात. आज तोच दिवस आहे. मानसन्मान वाढेल.

कन्या- विष्णू उपासना फलदायी ठरेल. भाग्यकारक घटनांचा आजचा दिवस आहे. मन पवित्र राहील.सर्व सुखासाठी दिवस उत्तम.

Horoscope Today
Money Vastu Tips: पर्समध्ये या गोष्टी ठेवूच नका, पैसा होतो खर्च

तूळ- न्यायाने आणि सचोटीने वागणूक आज तुम्हाला चांगली ठरेल. आपल्या जवळचे लोक पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करतील. तुम्हाला सावधगिरीचा इशारा आहे.

वृश्चिक - केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. अनेक गोष्टी व्यवसायामध्ये नवीन वाटा निर्माण करण्यासाठी कराल. सच्चेपणाने मेहनत केलेली आज फळाला येईल.

धनु -चोर चोरी पासून सावध राहण्याचा आजचा दिवस आहे. आजार डोके वर काढतील. मनस्थिती दोलायमान राहील.

Horoscope Today
Vastu Tips: चुकूनही घरामध्ये 'या' ठिकाणी पैसे ठेऊ नका, रातोरात होऊ शकता कंगाल, लक्ष्मी होईल नाराज

मकर - शिव उपासना फलदायी ठरणार आहे. प्रेमाचे नवीन क्षितिज गाठाल. शेअर्समध्ये फायदा आहे. पैशाचे गुंतवणूक योग्य प्रकारे केल्यास त्याच्यात वाढ होईल.

कुंभ - घरामध्ये वातावरण चांगले राहील. एखाद्या कौटुंबिक समारंभ किंवा धार्मिक कार्य घरी पार पडेल. पाहुण्यांची ऊठबस राहील.

मीन- वेगवान दिवस राहील. छोटे प्रवास घडतील. एकत्रितरित्या अनेक कामे आल्यामुळे भांबावून जाण्याचा संभव आहे. त्याचे योग्य नियोजन केल्यास सुनियोजित दिवस राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com