Rashi Bhavishya : अपेक्षांना पंख फुटतील, गोष्टी मनासारख्या घडतील; या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखाचा

Horoscope Today 10th July 2024 : आजचे संपूर्ण राशीभविष्य आणि दैनिक पंचांग वार बुधवार दिनांक १० जुलै २०२४ अपेक्षांना पंख फुटतील, गोष्टी मनासारख्या घडतील; या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखाचा
आजचे संपूर्ण राशी भविष्य
Daily Horoscope Today 10th July 2024Saam TV
Published On

आजचे पंचांग - १० जुलै २०२४

वार - बुधवार आषाढ शुक्लपक्ष. तिथी -पंचमी.नक्षत्र-मघा. योग -व्यतीपात करण - वाणिज. रास - सिंह. दिनविषेश - व्यतिपात वर्ज्य

मेष : "भेटी लागे जीवा" असा आजचा दिवस आहे. उपासना केल्यावर उत्तम फळ मिळेल. देवाने सगळ्या गोष्टी दिल्यामुळे एक वेगळी कृतकृत्य भावना आज आपल्या मनात येईल. सर्व सुख आणि आनंद घेऊन येणारा आजचा दिवस आहे.

वृषभ : "असावे घरकुल आपुले छान". घरासाठी असणाऱ्या नवीन गोष्टींची खरेदी होईल. काही व्यवहार मार्गी लागतील. घरात आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवस बरा जाईल.

मिथुन : "केल्याने होत आहे रे" खूप गोष्टी केलेल्या आज त्याचा फलित मिळणार आहे. एकूणच कर्तुत्व बहरेल. कर्तव्यामध्ये कसूर राहणार नाही. आपल्यासाठी आज आदराची भावना इतरांना येईल.

कर्क : "प्रेम हे माझे तुझे" अशी कुटुंबियांविषयी भावना राहणार आहे. खेळीमेळीचे वातावरण, खाद्यपदार्थांची रेलचेल आणि पैशाची आवक जावक यासाठी सुवर्णसंधी घेऊन आलेला आजचा दिवस आहे.

सिंह : "उडीं उडीं जाय" असा आजचा दिवस आहे. अपेक्षांना पंख फुटतील आणि ते करण्यासाठी बाह्यावर करून आपण पुढे सरसवाल. वेगळाच आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात होणार आहे.

कन्या : "कुणी याल का सांगाल का" अशी द्विधा मनस्थिती आज राहील. अनेक गोष्टी आपल्याला येतात निर्णयासाठी कोणीतरी हवे असते. तो आजचा दिवस. मनस्वास्थ्य नीट ठेवा. विनाकारण पैसाही खर्च होण्याची शक्यता आहे.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Kanya Rashi Personality : कन्या राशीच्या लोकांमध्ये असतात १० खास गोष्टी; इतरांना करतात प्रभावित, जाणून घ्या

तुळ : कामे वाढतील आणि गोष्टी मनासारख्या घडतील. इच्छांना पंख फुटतील. सगळं काही सुरळीत आणि मार्गी लागलं आहे अशा भावनेमध्ये राहाल. नातेवाईकांचे आणि मित्रांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक : "चलता चल तू साथी चलता चल" कामांमध्ये सगळ्यांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. तरी सुद्धा दिवसाची इतिश्री समाधानात होईल. कीर्ती, संपदा या गोष्टीत भरच पडणार आहे. कामासाठी प्रवास घडतील.

धनु : मोठे प्रवास, तीर्थयात्रा, परदेश गमन याचे विचार असल्यास त्याला प्राधान्य क्रमाने मार्गी लावा. नातवंडांचे सौख्य तसेच उपासनेतून शांती मिळण्याचा आजचा दिवस आहे.

मकर : आयुष्यात पळवाटा नव शोधता नेटाने काम करण्याचा आज निर्णय घ्या. अडचणी असल्या तरी त्याच्याशी दोन हात करा. कारण त्या आज येणारच आहेत. सावध रहा.

कुंभ : "ओ सजनी रे" असा आजचा दिवस आनंद आणि उत्साह घेऊन आलेला आहे. व्यवसायातील भागीदार आणि आयुष्यातील जोडीदार याच्या साथीने दिवस आनंदाचा राहील.

मीन : गुप्तशत्रु, गुप्त आजार डोके वर काढतील. आज गढूळ पाणी इतर खाण्याचे पदार्थ यापासून स्वतःला जपा. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Horoscope Today : आळस झटका अन् कामाला लागा, आज 'या' राशींच्या लोकांचं पालटणार नशिब ; वाचा राशीभविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com