Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, गौरीचे आगमन होताच या राशींना येणार सुखाचे दिवस; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today Marathi : मंगळवार १० सप्टेंबर २०२४. भाद्रपद शुक्लपक्ष. गौरी आवाहन. गौरीचे आगमन होताच या राशींना येणार सुखाचे दिवस, वाचा आजचे राशीभविष्य...
आजचे संपूर्ण राशी भविष्य
Daily Horoscope Today 10th August 2024Saam TV
Published On

आजचे पंचांग - मंगळवार १० सप्टेंबर २०२४. भाद्रपद शुक्लपक्ष. गौरी आवाहन २०:०४ प. तिथी-सप्तमी २३|१३. रास-वृश्चिक. नक्षत्र-अनुराधा. योग-विष्कंभ. करण-गरज. दिनविशेष-उत्तम दिवस.

मेष - आपला तडफदार स्वभाव इतरांना कधीकधी मत्सराची भावना निर्माण करतो. त्यामुळे आज स्वतःला जपा. नजर लागणे, कामाला खीळ बसणे अशा गोष्टी होऊ शकतात.

वृषभ - एखाद्यावर खरे प्रेम करायचे आपल्याकडून शिकावे. आपण नेहमी मनापासून नाती राखता. आज जोडीदारावर असेच प्रेम येईल. जोडीदार आपल्या प्रेमात सुखावून जाईल. कामामध्ये सुध्दा मन लागल्यामुळे दुपटीने काम कराल.

मिथुन - एकाच वेळी दहा गोष्टी करण्याच्या भानगडीत आज पडू नका. एकच काम पण व्यवस्थितपणे करणे जमावे लागते. तरच आज नीटनेटके होऊ शकेल. नाहीतर "एक ना धड भाराभर चिंध्या" अशी गोष्ट होऊन जाईल.

कर्क - स्वतःपेक्षा इतरांचा अधिक विचार करणारी आपली राशी आहे. मुलाबाळांवर विशेष आणि अतोनात प्रेम आपण करता. आज याच प्रेमामध्ये अजून वृद्धी होईल. संसारामध्ये रमून जाल.

सिंह - घरच्या जबाबदाऱ्या खूपदा आपल्याला एकट्यालाच पेलाव्या लागतात. सुखाची आस लागते पण सुख पुढे जाते. अशीही काहीशी भावना होते. पण आज काही गोष्टी हाती लागतील आणि मन सुखावेल.

कन्या - अती विचारी स्वभावामुळे कधी कधी स्वतःचे नुकसान होते. पण आज याच विचारामुळे अनेक चांगल्या गोष्टी आज मार्गी लागणार आहेत. इतरांकडून शाबासकी मिळेल.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Ganesh Chaturthi 2024: 'या' तीन राशींवर राहणार गणपती बाप्पाची कृपा; अनंत चतुदर्शीपर्यंत मिळणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा

तूळ - पैशाचा हिशोब नीट आणि व्यवस्थित आज आपल्याकडून ठेवला जाईल. व्यापार, व्यवसायासाठी दिवस चांगला. गुंतवणूक आणि आवक जावक चांगली राहील.

वृश्चिक - मुळातच तुमचे व्यक्तिमत्व रुबाबदार आणि चांगले आहे. आज काही जणांच्या खुशामतीमुळे अजून झळाळी येईल. स्वमग्न रहाल. आनंदी दिवसांची नांदी आहे.

धनु - कामाचे स्वरूप वाढते राहणार आहे. करिअरमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आज होणार आहेत. भले दगदग त्रास कटकट वाढेल पण हाती काहीतरी चांगल्या गोष्टी पुढे नक्की मिळणार आहेत.

मकर - मुलांच्या विवाहाचे प्रस्ताव येतील. त्यांच्या सुखाचे दिवस बघण्याचे आता आपले दिवस आले आहेत. त्यामुळे आनंदाने नातेवाईकांची उठबस सुद्धा कराल. दिवस चांगला जाईल.

कुंभ - "घार उडे आकाशी तिचे लक्ष पिलापाशी" अशी आज आपली अवस्था आहे. करिअर आणि घर या दोलायमान अवस्थेमध्ये मन राहील. करिअरमध्ये उंच आणि उच्चवाटा असल्या तरी नजर मात्र घराकडे राहील.

मीन - दिवसाला शंभर रुपये मिळाले तर देवासाठी नक्कीच दहा रुपये काढणारे आपली रास आहे. संसारातल्या गोष्टी करताना परमार्थ आणि संसार या दोन्ही गोष्टी योग्य रीतीने सांभाळताना आज आनंद वाटेल.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Chandra Grahan: 'या' राशींच्या आयुष्यावर पितृ पक्षात लागणार ग्रहण; चंद्र ग्रहणामुळे आर्थिक नुकसानीची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com