आषाढ कृष्णपक्ष. तिथी - एकादशी. नक्षत्र - रोहिणी. योग - ध्रुव. करणबालव. रास - वृषभ. दिनविशेष - उत्तमदिवस
शारीरिक तब्येत नाजूक असेल. विनाकारण हॉस्पिटलवर खर्च होण्याचा दिवस आहे. मनस्ताप टाळा. उपासना पाळा.
आज मदहोंश हुआं जायें रें.. असा आजचा दिवस आहे. सुखाचे स्वप्न रंगवाल आणि ती स्वप्ने पूर्ण सुद्धा होतील. काही सुसंधी घेऊन आजचा दिवस आलेला आहे.
"तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं" अशा गोष्टी पैसा जोडण्यासाठी मनात येतील. पैशाचा योग्य विनियोग कराल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल .
स्वभावताच असणाऱ्या सर्व गोष्टी आज करण्याचा दिवस आहे. मनाप्रमाणे वागाल इतरांनाही आपले वागणे आवडेल. शेजारी चांगले संबंध राहतील.
दान, दानत चांगली राहील. मनस्वास्थ बरे राहील. कधीतरी आपल्याला काय चांगले वाटते यापेक्षा दुसऱ्याला बरे वाटते म्हणून त्या गोष्टी करण्याचा जो दिवस आहे तो आजचा आहे.
शेअर्स, लॉटरी यामध्ये फायदा होईल. उपासना फलदायी ठरेल. संतती सौख्यासाठी दिवस चांगला.
नोकरीमध्ये कटकटी वाढतील. नोकर नोकरांच्यामध्ये दरी निर्माण होईल. आपल्याविषयी उगाचच कोणीतरी कान फुंकत आहे अशी जाणीव राहील. काळजी घ्या.
न बोलता संयमाने कामे कराल. कोर्टकचेरीचे निकाल मनाप्रमाणे लागतील. आजचा दिवस आपलाच आहे. त्याचा सर्व फायदाही आपलाच होईल. व्यवसाय व्यापार वाढेल.
धावपळ, कटकटींचा सामना आज आपल्याला करायला लागेल. अचानक धनलाभाचे सुद्धा योग आहेत. परिस्थितीशी दोन हात करा.
देवाने दिलेल्या गोष्टींमध्ये थोडेही आपल्याला दान कमी मिळत नाही अथवा अधिक काही गोष्टी मिळत नाहीत. भाग्यातलं कोणी हिरावूनही घेत नाही. समाधानाने दिवस कंठा तर आजचा दिवस आपलाच आहे.
कामाच्या ठिकाणी आपलाच डंका असेल. शांतपणे मन लावून काम कराल. सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा दिवस आहे.
जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. परदेशाशी निगडित व्यवहार होतील. काही भाषा शिकण्याची आवड असेल तर आज ती हौस पूर्ण होण्याचा दिवस आहे. आजच सुरुवात करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.