
वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व असूने त्याला राक्षसांचा गुरू मानला जातं. तो ग्रह शुभ ग्रहांपैकी एक आहे. शुक्र हा संपत्ती, समृद्धी, भव्यता, प्रेम, आकर्षण, वैवाहिक सुख आणि विलास यांचा स्वामी आणि नियंत्रक आहे. २८ जानेवारी २०२५ पासून शुक्र त्याच्या उच्च राशीमध्ये स्थित असेल, जो अत्यंत शुभ मानला जातो.
मीन राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. शुक्र त्याच्या उच्च अवस्थेत आपल्या संपूर्ण सामर्थ्याने आणि सकारात्मकतेने जातकांना लाभ देण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सौंदर्य येत असते. तर देवगुरु गुरु वृषभ राशीमध्ये स्थित आहे, ज्याचा स्वामी शुक्र आहे. दुसरीकडे शुक्र देखील वृषभ राशीमध्ये स्थित आहे.
ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या परस्पर संबंधांचा सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत असतो. या संबंधांमधील एक विशेष योग म्हणजे ‘परिवर्तन राजयोग’. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या राशीमध्ये असतात, म्हणजेच एक ग्रह दुसऱ्या राशीमध्ये असतो आणि दुसरा पहिल्या राशीमध्ये असतो तेव्हा राजयोग तयार होतो. सध्या शुक्र आणि गुरू हे संयोग घडवत आहेत. यामुळे दोन्ही ग्रहांच्या संयुक्त शक्तीचा शुभ प्रभाव लोकांच्या जीवनावर खोलवर पडत असतो. त्याचा प्रभाव ५ राशींवर शुभ राहील, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ
वृषभ राशीच्या लोकांवर या परिवर्तन योगाचा विशेष प्रभाव पडेल, कारण गुरू स्वतः या राशीत आहे. गुरूच्या कृपेने करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतात, तर व्यावसायिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि दीर्घकाळ प्रलंबित पैसे परत मिळू शकतील.
गुरू आणि शुक्राच्या बदल संयोजनाचा सिंह राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल. या काळात सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात मोठे बदल दिसून येतील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात किंवा त्यांच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध दृढ होतील आणि अविवाहित लोकांचे लग्न होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असेल.
तूळ राशीच्या लोकांना शुक्र आणि गुरूच्या बदलामुळे विशेष लाभ मिळेल. या काळात त्यांच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल आणि त्यांना बढतीही मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप शुभ राहील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि घरात काही शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या बाबतीत अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. व्यापारी आणि गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो आणि नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचे किंवा नवीन प्रकल्प मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. घरामध्ये काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कोणतीही कायदेशीर बाब प्रलंबित असल्यास, या काळात तुमच्या बाजूने निर्णय लागण्याची शक्यता जास्त आहे.
शुक्राच्या उच्च स्थानामुळे मीन राशीच्या लोकांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या परिवर्तन योगाने जीवनात यशाचे नवे मार्ग खुले होतील आणि सौभाग्य वाढेल. विद्यार्थी आणि संशोधकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असेल, कारण त्यांची एकाग्रता वाढेल आणि त्यांना अभ्यासात यश मिळेल. प्रेम संबंध मजबूत होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.