Shadashtak Yog: सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे बदलणार ५ राशींचे भाग्य, दूर होतील संकटं !

Shadashtak Yog: ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सूर्य आणि मंगळ षडाष्टक योग तयार करत आहेत. या योगाच्या शुभ प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
Shadashtak Yog
Shadashtak Yog:Saam Tv
Published On

ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि मंगळाचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा, ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जातं. सूर्याला ग्रहांच्या राजाचे स्थान असून त्याचा प्रभाव व्यक्तीच्या आत्मा, प्रतिष्ठा आणि यशावर पडत असतो. तर मंगळ ग्रह हा ऊर्जा, धैर्य आणि संघर्षासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. यात ग्रहांच्या कमांडरचे स्थान आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या कर्म आणि स्व-संरक्षणाशी संबंधित बाबींचे प्रतिनिधित्व करत असते.

सूर्य-मंगळ षडाष्टक योग

शुक्रवार ७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.० ८ वाजता सूर्य आणि मंगळ षडाष्टक योग तयार करताहेत. सूर्य आणि मंगळ एकत्र येतात तेव्हा माणसाच्या जीवनात धैर्य, सामर्थ्य आणि आत्मविश्वास यांचा मिलाफ होत असतो. हा योग जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती देतो तसेच यश मिळवून देत असतो. जर ऊर्जाला योग्य संतुलित केलं तर हे जीवनात यश मिळवून देत असते. मंगळ भूमीचे कारक आहेत तर सूर्य मोठं पद आणि सरकारी लाभकारक आहे. त्यामुळे व्यक्तीला या क्षेत्रात यश मिळत असते.

या राशींवर मंगळ षडाष्टक योगाचा प्रभाव

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संयोगाचा राशींवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत असतो. ७ फेब्रुवारी २०२५ पासून तयार होणारा सूर्य आणि मंगळाचा षडाष्टक योग हा ५ राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. सूर्य-मंगळ षडाष्टक योग हे जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या स्थानावर असतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त १५० अंशांचा फरक असतो. या योगाच्या प्रभावामुळे या ५ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता असते. जे उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांमधून त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत करत असते.

मेष

सूर्य आणि मंगळाचा षडाष्टक योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. यावेळी करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी आणि प्रकल्प मिळू शकतात. हे दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहेत. नोकरदार लोक पदोन्नती किंवा पगारवाढीची अपेक्षा करू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. काही जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास आणि उत्साहाने भरलेला असेल. तुमची सर्जनशीलता आणि निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळवून देणारं आहे. उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होऊन बढती मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठी गुंतवणूक किंवा मार्केटिंगमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.

तूळ

हा योग तूळ राशीच्या लोकांसाठी प्रतिष्ठा आणि यश मिळवून देणारा असेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कौशल्याची प्रशंसा होईल. पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोक नवीन संधी शोधू शकतात, ज्या फायदेशीर ठरतील. व्यावसायिकांना बाजारात आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळेल. शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण राहील आणि तुमची बचत वाढेल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ ज्ञानाचा आणि विस्ताराचा असेल त्यांना शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम यश मिळेल. संशोधन, लेखन किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन यश मिळू शकते. व्यवसायात नवीन करार आणि भागीदारीच्या संधी मिळतील. तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम सुरू करू शकता, जे फायदेशीर ठरेल. पैशाच्या बाबतीत काळ अनुकूल राहील. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल आणि तुम्ही नवीन योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा योग आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य-मंगळाचा संयोग जीवनात नवीन शक्यता घेऊन येईल. करिअरमधील जुने अडथळे आता दूर होतील. नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन कामाच्या संधी तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतील. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे. व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर सौदे मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com