Rahu Gochar 2025: पुढच्या वर्षी राहू करणार शनीच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींना नवीन नोकरीची संधी, नफा-फायदा!

Rahu Gochar 2025: वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये राहु ग्रहाला पापी ग्रह मानलं जातं. 18 मे 2025 रोजी राहू आपली राशी बदलून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
Rahu Gochar
Rahu Gocharsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये राहु ग्रहाला पापी ग्रह मानलं जातं. राहु नेहमी वक्री चाल चालतो. म्हणजेच राहू कधीही पुढे जाण्याऐवजी वक्री चाल चालतो. राहू सध्या गुरूच्या राशीत मीन राशीत आहे आणि राहू आता मेष ऐवजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. पुढच्या वर्षी राहु गोचर करणार आहे.

कधी आहे राहूचं गोचर?

18 मे 2025 रोजी राहू आपली राशी बदलून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. राहू सुमारे १८ महिने या राशीत राहणार आहे.त्यानंतर हा मायावी ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या राशीत 2025 मध्ये कुंभ राशीत राहुचं आगमन होणार असून हे काही राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींना राहूच्या गोचरचा लाभ होणार आहे.

Rahu Gochar
November Grah Gochar: नोव्हेंबर महिन्यात ४ ग्रह बदलणार त्यांची स्थिती; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

कन्या रास

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये राहु कन्या राशीच्या लोकांसाठी सहाव्या भावात कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळणार आहेत. कोर्टात सुरू असलेले वाद मिटू शकणार आहेत. तुम्हाला प्रत्येक कामात कुटुंबातील सर्वांचं सहकार्य मिळणार आहे.

धनु रास

2025 मध्ये राहू तुमच्यासाठी तिसऱ्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात तुमची प्रलंबित कामं 2025 मध्ये पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहेत. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. बिझनेसमधील गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर आणि यशस्वी होणार आहेत.

मेष रास

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहुचं गोचर शुभ मानलं जातंय. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. यावेळी लाभाच्या संधी वाढणार आहेत. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला चांगला नफा मिळेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगली संधी मिळेल. कुटुंबातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे.

Rahu Gochar
Zodiac Signs: २६ नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींचा खिसा राहणार पैशांनी भरलेला; प्रत्येक गोष्टीत मिळणार यश

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com