Numerology: महिन्याच्या 'या' तारखांना जन्मलेले व्यक्तींना जीवनात सहज मिळत प्रेम आणि संपत्ती

Numerology: ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६,१५,२४ या तारखांना झाला असेल त्यांचा भाग्यांक ६ आहे. शुक्र या ग्रहाचा अधिपत्याखाली हे लोक येतात. प्रेम, सहानुभूती आदर यांचे प्रतीक म्हणजेच आपण आहात. तुम्ही जन्मतः कलाप्रिय आणि कलाकार आहात.
Numerology: महिन्याच्या 'या' तारखांना जन्मलेले व्यक्तींना जीवनात सहज मिळत प्रेम आणि संपत्ती
Numerology
Published On

ज्या लोकांचा भाग्यांक ६ असेल त्यांच्या जीवनात प्रेम, आपुलकी, स्नेह, आरोग्य, पैसा सहजगत्या मिळत असतो. कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही महिन्याच्या ६,१५,२४ या तारखांना झाला असेल त्यांचा भाग्यांक ६ आहे. जीवनाबद्दलचे सौंदर्य त्याची ओढ विशेष असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे, त्यामुळे भेटणाऱ्या लोकांना आनंद वाटतो.

तुमचा सहवास उत्साहवर्धक असतो. बोलण्यात आकर्षण, मोहकपणा त्यामुळे लोक तुमच्याकडे ओढले जातात. तुमची नीती आणि त्या बद्दलच्या कल्पना वेगळ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. सामाजिक रूढी आणि बंधनांना तुम्ही फाटा देता.

Numerology: महिन्याच्या 'या' तारखांना जन्मलेले व्यक्तींना जीवनात सहज मिळत प्रेम आणि संपत्ती
Numerology Number 3 : या तारखांना जन्मलेले व्यक्ती आयुष्यात मिळवतात मोठं यश; तुमचा भाग्यांक कोणता?

सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, प्रेम, आपुलकी, आकर्षण या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजगत्या मिळालेल्या आहेत. कला, नृत्य, गायनाची विशेष आवड आहे. आपले आयुष्य आरामदायक, ऐश्वर्ययुक्त,श्रीमंतीत आनंदात जावे, याकडे तुमचा विशेष कल असतो. पैसे वाचवण्यापेक्षा खर्च करण्याची प्रवृत्ती असते. उच्च प्रतीचे कपडे दागदागिने, जड जवाहिर,सुगंधी द्रव्य, विविध सुंदर वस्तूंचे तुम्हाला आकर्षण वाटते. आपण भावनाप्रधान असून भावनावर ताबा ठेवणे अवघड जाते.

नोकरी व्यवसाय पाहता -

उच्च दर्जाची बुद्धिमत्ता स्मरणशक्ती चांगले त्यामुळे हे लोक नोकरी व्यवसायामध्ये राजदूत, गव्हर्नर, सल्लागार अशा विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात. तर गुढ विद्येची आवड असते. त्या क्षेत्रातही हे लोक पुढे येतात. भाषण लिखाण रेडिओ वरील श्रुतिका यामध्ये यश मिळते. आर्किटेक्ट,ज्वेलरी, हॉटेल मॅनेजमेंट, मेवा मिठाईचा व्यवसाय यामध्ये यश मिळेल. जमीन जुमले, खरेदी विक्रीतील दलाल, मोबदला घेऊन काम करणारे दलाल या व्यवसाय मध्ये यशस्वी होतात.

तब्येतीचा विचार केला तर -

प्रकृती उत्तम असते. परंतु साथीचे रोग, शीत ज्वर होण्याची शक्यता असते. घसा, कंठ, वाचा विकार होतात. Tonsils वाढतात. क्वचित प्रसंगी नैराश्य येते.पण ते जास्त काळ टिकत नाही. स्त्रियांना मासिक पाळीचे आजार होऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com