Monday Horoscope : कामाची दगदग वाढेल; ५ राशींच्या लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार

Monday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांची कामाची दगदग वाढेल. तर काही लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार आहे.
Horoscope in Marathi
Horoscope Saam tv
Published On

पंचांग

सोमवार,१५ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष,सफला एकादशी.

तिथी-एकादशी २१|१२

रास-तुला

नक्षत्र-चित्रा

योग-शोभन

करण-बवकरण

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - आज सफल एकादशी आहे. मनातील इच्छा सफल होण्याचा दिवस आहे. जोडीदाराबरोबर एखादा नवीन संकल्प करून श्रद्धेने त्याचा पाठपुरावा केल्यास तो सिद्धीस जाईल. व्यवसाय जोमात चालेल.

वृषभ - खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जसे की पोटदुखी या वाढू शकतील. आपल्या जवळच्या लोकांना पासून सावधगिरी बाळगा . असा इशारा आहे.

मिथुन - आज सफला एकादशी आहे. आपल्या राशीला विष्णू उपासना शतपटीने अधिक फल देईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. शेअर्समध्ये पैसे गुंतवायला हरकत नाही.

Horoscope in Marathi
Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वीच निघेल 'दिवाळं', चुकूनही घराला देऊ नका हे रंग, वास्तुदोषाचा करावा लागेल सामना

कर्क - शेतीचा व्यवसायात नवीन तंत्र, मंत्र अवलंबाल.आपला आदर्श इतर काही लोक घेऊन पुढे जातील. सहज सोप्या गोष्टीने यशाकडे झेप घ्याल.सर्व सुखकारक दिवस आहे.

सिंह - मत भिन्नता सोडून आपल्या जवळच्या व्यक्तींची गोड बोलायला हवे. शेजारील लोकांकडून वेळेला सहकार्य मिळेल. इतरांच्या काही जबाबदाऱ्या घेऊन आज त्या आपल्याला पेलाव्या लागतील.

कन्या - पैशाला पैसा वाढण्याचा आजचा दिवस आहे. व्यवसायामध्ये सतर्कता बाळगावी लागेल. जुन्या गुंतवणुकीतून खेळता पैसा वाढीस लागेल.

Horoscope in Marathi
Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रानुसार या शुभ वस्तू घरात ठेवा, हातात खेळता पैसा राहील

तूळ - दिवस चांगला आहे. स्वतःसाठी जगताना दानधर्म, उदारता, समोरच्याच्या चांगल्या गुणांची पारख असणे या गोष्टी आज कराल. एकादशी खरंच आपल्याला सफलतेकडे घेऊन जाणारी आहे. दिवस आनंदादायी , आरोग्यदायी आहे.

वृश्चिक - कामाची दगदग वाढेल. अर्थात विचारांची दिशा बदलली तर नकारात्मकता बाजूला टाकून जे चांगलं होतं त्यावर विचार करा. दूरचे प्रवास होतील. कष्टाच्या मानाने फळ मिळेल असा दिवस नाही.

धनु - प्रेमाला वेगळेच वळण लागेल. पैशाशी निगडित लाभ होतील. सून जावयाच्या स्नेहात आनंद वाटेल. मित्र-मैत्रिणी मदत करतील. दिवस चांगला आहे.

Horoscope in Marathi
Vastu Tips: या पर्सनल गोष्टी इतरांसोबत कधीही शेअर करू नका, अन्यथा...

मकर - सामाजिक क्षेत्रात ऊठबस होईल. कामाला काम वाढेल. आपला लोकसंग्रह चांगला आहे. जिद्द चिकाटी न सोडता आपले कामाचे क्षेत्र वाढीव कराल.

कुंभ - आज सफला एकादशी. विष्णू उपासना मनाला आनंद देणारी ठरेल. मोठ्या प्रवासाची योगही येतील. जवळच्या लोकांकडून, संततीकडून फायदा संभवतो आहे. भाग्यकारक दिवस आहे.

मीन - मोठ्या प्रकारचा धनलाभ होण्याचे आज योग आहेत. जसे काही घबाड मिळाले. पण आपल्या साधेपणामुळे कुठे फसले जाणार नाही ना, याची काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com