Monday Horoscope : गोड बातमी कानावर पडणार; पद, पैसा, प्रतिष्ठा मिळणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Monday Horoscope In Marathi : आज काही राशींच्या लोकांना गोड बातमी मिळणार आहे. तर काहींना समाजात मान मिळेल. वाचा सोमवारचं राशीभविष्य
horoscope in marathi
horoscope Saam tv
Published On

आजचे पंचांग

सोमवार,२१ जुलै २०२५,आषाढ कृष्णपक्ष, कामिका एकादशी.

तिथी-एकादशी ०९|३९

रास- वृषभ

नक्षत्र- रोहिणी

योग-वृध्दि

करण-बालव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - आज कामिका एकादशी आहे. घरातील वातावरण एखाद्या छोट्या धार्मिक कार्यामुळे प्रसन्न राहील. पैशासाठी धन योगासाठी विशेष संकल्प केले जातील. कुटुंबीयांचा पाठिंबामुळे अश्वस्त असाल.

वृषभ - आज "मन चंगा तो कठौती मे गंगा" असा काहीसा दिवस आहे. स्वास्थ छान राहील. आपली एकादशी आपल्या मनातच आहे. स्वस्थता आणि समाधानाने परिपूर्ण भारलेला आजचा दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन- "कोणी निंदा वा बंदा" असा काहीसा दिवस आपल्याला घालवावा लागेल. इतर काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही आपल्याला काय वाटते हे बघून काम करा. तरच मनोबल उत्तम राहील. अनावश्यक खर्च निघतील.

कर्क - "धरण उशाशी कोरड घशाशी" असा काहीसा दिवस आहे. जुने केलेल्या गोष्टीतून लाभ मिळणार आहे. पण ते प्रत्यक्षात येण्यापर्यंत वेळ लागेल. मात्र स्नेही जणांचा पाठिंबा आपल्याला आजचा दिवस सुखकर नेण्याला मदत करेल.

सिंह - आपला कार्यकारण भाव चांगला राहील. सामाजिक पद, पैसा, प्रतिष्ठा यांनी भारलेला दिवस असेल. मानसन्मान मिळतील. इतरांच्या नजरेत आपली प्रतिमा उंचावेल. दिवस आनंदी आहे.

कन्या - हरवले ते गवसेल आज असा दिवस आहे. अनेक दिवस ज्याची वाट पाहत आहात अशा काही घटना आणि सुवर्ता कानावर येतील. बुद्धिमत्तेने अडचणींवर मात कराल. पौत्र सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

horoscope in marathi
Vastu Tips: सतत आजारी पडता का? जाणून घ्या घरातील वास्तु दोष आणि त्यावरील सोपे उपाय

तूळ - "धोंडा उषाशी अनुभव गाठीशी" असा काहीसा दिवस आहे. आपलं कोण परक कोण हे ओळखून आज कामे करा. मैलाचा दगड पार पाडावा लागेल. तेवढेच अनुभवानी सिद्ध व्हाल.

वृश्चिक - व्यवसायामध्ये उडी मारणे किंवा नवीन गोष्टीच्या संकल्पना रुजवणे यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायिक भागीदाराकडून योग्य ते सहकार्य मिळाल्यामुळे कामाला चालना मिळेल. दिवस संमिश्र आहे .

धनु - पायाशी निगडित आजार उद्भवतील.दोलायामान मनस्थिती मुळे होणारे परिणामांना तोंड द्यावे लागेल. आपलीच माणसे पाठीत खंजीर खूपसतात अशी आज भावना होईल. पण यातून वाट काढावी लागेल. पळवाट नाही.

horoscope in marathi
Vastu Tip: घरासमोर पपईचं झाड नकोच! जाणून घ्या पाठीमागचं कारण

मकर - "अबोल प्रीत बहरली" असा काहीसा दिवस आहे. मनातील भावना व्यक्त होणार नाहीत. पण आज करा असा सल्ला राहील. जवळच्या व्यक्तीबरोबर घनिष्ठ संबंध प्रस्थापित होतील. आज कामिका एकादशी आहे.

विशेष विष्णू उपासना करावी.

कुंभ - कशाचा तरी शोधार्थ जावेसे वाटेल. नव्या काही गोष्टी उत्खनन कराव्याशा वाटतील. अभ्यासाचा ध्यास राहील. प्रगतीची आस राहील. संशोधनाची कास राहील. दिवस चांगला आहे.

मीन - जोडलेल्या गोष्टीचे बंध अधिक दृढ होतील. प्रेमामध्ये विशेष लाभ होतील. जवळच्या व्यक्तीमुळे अनेक संधी येतील. आपला पराक्रम वाढीस लागेल. असा दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com